घरात अशा डिझाईन्सच्या बेडशीट्स वाढवतील शोभा (फोटो सौजन्य - बॉम्बे डाईंग)
गणेश चतुर्थी हा आनंदाचा, एकत्मतकेचा आणि सर्वांसाठी आनंदाचा काळ आहे. गणेशोत्सवात केवळ माणसांची मनं प्रसन्न होतात असं नाही तर तुमचं घरदेखील सजत असतं आणि सर्वात महत्त्वाचे ठरतात ते म्हणजे घराचा हॉल आणि बेडरूम. यामध्ये नक्की कोणत्या बेडशीट्स वापरायच्या, त्याची रंगसंगती कशी असेल याचेही प्लॅन्स आखले जातात. तुम्ही आता गपणतीसाठी आणि नंतर नवरात्रीसाठीही बेडशीट्सचा प्लॅन आखत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.
कुटुंब आणि मित्रांच्या भेटीसह, तुमच्या जागेचा प्रत्येक कोपरा उबदारपणा आणि सुरेखतेचा स्पर्श देण्यास पात्र आहे. तुमच्या घराचे रूपांतर करण्याचा सर्वात सोपा पण प्रभावी मार्ग म्हणजे क्लासी बेडशीट्सचा वापर. योग्य डिझाइन, फॅब्रिक्स आणि रंग तुमच्या खोल्या केवळ अधिक आकर्षक बनवत नाहीत तर उत्सवासाठी परिपूर्ण पार्श्वभूमीदेखील सेट करतात. खिरोदा जेना, मुख्य वित्तीय अधिकारी ऑपरेशन्स, बॉम्बे डाईंग यांनी खास आपल्या वाचकांसाठी कोणत्या प्रकारच्या बेडशीट्स वापरायच्या यासाठी टिप्स दिल्या आहेत, जाणून घ्या
सांस्कृतिक स्टोरीटेलर बेडशीट्स
परंपरा जपणारे डिझाईन
उत्सव हे परंपरेबद्दल असतात आणि अजरख ते कसवू आणि मधुबनी पर्यंतच्या भारतातील समृद्ध हस्तकलेपासून प्रेरित बेडशीट्स अशा उत्सवाच्या वेळी घरातील घरपण जिवंत करतात. रत्नजडित रंग, त्यावर सुंदर कलाकुसर आणि १००% मऊ सुती कापडांचा वापर अशा बेडशीट्स बसायला आणि घराला अधिक आकर्षक बनविण्यास नक्कीच उपयोगी ठरतात. अशा बेडशीट्सचा वापर तुम्ही यावेळी घरात करा
कमालीची रंगसंगती आणि क्लासी वूड फर्निचर, असा आहे सोनाक्षीचा 11 कोटीचा फ्लॅट
रॉयल प्रेरणा
रॉयलनेस डिझाईन
तोचतोचपणा आवडत नसेल आणि ज्यांना भव्यता आवडते त्यांच्यासाठी, राजवाड्यापासून प्रेरणा घेत डिझाइन कऱण्यात आलेली फुले, कमानी आणि पन्ना, माणिक आणि नीलम यांसारख्या राजेशाही रंगांनी डिझाइन केलेले बेडशीट तुमच्या जागेला एक भव्य लुक आणून देऊ शकतात. प्रीमियम कॉटनमध्ये बनवलेले हे बेडशीट्स परफेक्ट प्रिमियम लुक देतात आणि घराला एका रॉयल लुकमध्ये आणतात
आधुनिक मिनिमलिझम
आधुनिक शैलीसह डिझाईन
तुम्हाला जास्त बटबटीतपणा आवडत नसेल आणि कमी डिझाइनमध्ये जास्त सुंदरता अशी तुमची आवडत असेल तर राखाडी, नेव्ही किंवा सेजच्या शांत टोनमध्ये असणारे बेडशीट डिझाईन तुम्ही निवडा आणि आपल्या बेडरूमधील क्लासी आकर्षकता अधिक सुंदर बनवा. सध्या जितके कमी भपका देणार असते असे डिझाईन अनेकांना आवडते आणि तुम्हीही त्याचा वापर करून घेऊ शकता.
घरातील साहित्यांचा वापर करून बनवा मंगळागौरीची आकर्षक सजावट, पूजा पाहून सगळेच करतील कौतुक
लक्झरी
क्लासी आणि लक्झरी बेडशीट्स
हाय थ्रेड-काउंट कॉटन मिश्रणांसारखे सुंदर डिझाईनही तुम्ही यावेळी वापरू शकता. मऊ पोत, कम्फर्टेबल फॅब्रिक्स आणि नाजूक भरतकाम केलेल्या तपशीलांसह असणारे बेडशीट तुमच्या बेडरूमला गणपतीच्या या उत्सवात अधिक सुंदर लुक मिळवून देतात. दिवस असो वा रात्र तुम्हाला नक्कीच एक लक्झरी फील मिळवून देतात. तुम्हीही याचा वापर करून आपल्या घराला एक वेगळा लुक आणून देऊ शकता.
हेरिटेज ट्विस्ट
हेरिटेज डिझाईनच्या बेडशीट्स
क्लासिक भारतीय आकृतिबंधांसह जोडलेले मातीचे टोन सांस्कृतिक जुन्या आठवणीची भावना आणतात, परंतु सध्याच्या फ्रेश आधुनिक लेआउटसह. तुम्हालाही असे उत्तम मिश्रण हवे असेल तर तुम्ही अशा बेडशीट्सचा आपल्या रूमसाठी वापर करून घेऊ शकता. या गणेश चतुर्थीला आणि येणाऱ्या उत्सवांसाठी तुम्ही सजावटीच्यादेखील पलीकडे जाणारे बेडशीट निवडा, जे परंपरा, आराम आणि आधुनिक राहणीमान समान प्रमाणात साजरा करून घराला अधिक सुंदर आणि आकर्षक बनवतील.