येशू ख्रिस्ताच्या मृत्यू दिवसाला 'गुड फ्रायडे' असे का म्हंटले जाते?
प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या देवतांची पूजा केली जाते. त्याप्रमाणेच ख्रिश्चन धर्मीय लोक येशू खिस्तरांची पूजा करतात. दरवर्षी ईस्टर संडेच्या एक आठवडा आधी गुड फ्रायडे हा सण पाळला जातो.ख्रिश्चन धर्मात गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे हे दोन महत्वाचे सण आहेत. ख्रिस्ती धर्मातील मान्यतेनुसार या दिवशी येशू ख्रिस्ताना क्रॉसवर चढवण्यात आले होते. या दिवसाची आठवण आणि शोक व्यक्त करण्यासाठी सगळीकडे गुड फ्रायडे हा दिवस पाळला जातो. याशिवाय ख्रिस्ती देशांमध्ये राष्ट्रीय दुखवटा साजरा केला जातो. या दिवशी खिस्ती बांधव शोक व्यक्त करतात. गुड फ्रायडेच्या दिवशी कोणताही आनंदाचा कार्यक्रम किंवा कोणताही आनंद साजरा केला जातो. तर काही लोक या दिवशी चर्चमध्ये जाऊन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.(फोटो सौजन्य – iStock)
Good Friday 2025: गुड फ्रायडे कसा साजरा केला जातो? काय आहे त्यामागील धार्मिक महत्त्व
गुड फ्रायडेच्या दिवशी प्रभू येशूंवर अत्याचार करण्यात आले होते. त्यामुळे ख्रिस्ती बांधवांसाठी हा आनंदाचा दिवस नाही. त्यामुळे या दिवसाला गुड फ्रायडे असे नाव देण्यात आले. ख्रिश्चन समाजाप्रमाणे प्रभु येशू ख्रिस्त हे देवाचा पुत्र होते. ते लोकांचे भलं करण्यासाठी आणि अज्ञान दूर करून समाजात प्रेम आणि आनंद निर्माण करण्यासाठी पृथ्वीवर आले होते. पूर्वीच्या काळी येशू ख्रिस्तांवर अनेक अत्याचार करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी देवाजवळ प्रार्थना केली होती.
ख्रिस्ती बांधव गुड फ्रायडेच्या दिवशी घरात कोणतीही लाईट किंवा सजावट करत नाही. कारण या दिवशी शोक व्यक्त केला जातो. याशिवाय गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्तांच्या सात वाक्यांचा पाठ केला जातो. त्यानंतर चर्चमध्ये जाऊन येशू ख्रिस्तांचे स्मरण केले जाते. अनेक लोक यादिवशी काळे कपडे परिधान करतात. तसेच रस्त्यांवरून कोणतीच पदयात्रा काढली जात नाही. येशू ख्रिस्ताच्या मृत्यू दिनी चर्चमध्ये किंवा घरात कोणतीही मेणबत्ती आणि घंटा वाजवली जात नाही. तसेच समाज सेवा करत वस्तू दान केल्या जातात.
रहस्यमयी वातावरण, प्राचीन लेण्या; महाभारताशी संबंध अन् पांडव फॉल्सना कधी भेट दिलीत का?
येशू ख्रिस्ताच्या त्यागाबद्दल आभार मानत 40 दिवसांपूर्वीच उपासना करण्यास सुरुवात केली जाते. ज्याला लेंट असे म्हणतात. अनेक लोक शुक्रवारच्या दिवशी उपवास करतात. येशूचे भक्त यादिवशी प्रार्थना व दान करतात. गुड फ्रायडेच्या नंतर ईस्टर संडे पाळला जातो. कारण असे मानले जाते की रविवारच्या दिवशी येशू पुन्हा जिवंत झाले होते. येशू पुन्हा जिवंत झाल्यामुळे ख्रिस्तान धर्मीय लोक ईस्टर साजरा करतात.