हिरवीगार तुळशीची पाने आरोग्यासाठी ठरतील वरदान! 'या' पद्धतीने करा वापर
प्रत्येक घराच्या अंगणात एक तरी तुळशीचे रोप असतेच. तुळशीच्या पानांना धार्मिक दृष्ट्या खूप जास्त महत्व आहे. तुळशीच्या पानांचा वापर पूजेमध्ये केला जातो. याशिवाय औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली तुळशीची पाने आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. नियमित तुळशीचे एक पान चावून खाल्यास शरीरसंबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. ही पाने जंतूनाशक, विषाणूनाशक, दाहशामक, अँण्टी ऑक्सिडंट्स आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गुणकारी ठरतात. महिला तुळशीच्या पानांचा रस काढून त्वचेवर लावतात, ज्यामुळे पिंपल्स आणि डागांपासून सुटका मिळते. त्वचेसंबंधित सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुळशीची पाने प्रभावी ठरतील. चेहऱ्यावर आलेले फोड, मुरूम किंवा पुरळ, खाज, लाल रॅश कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर केला जातो.(फोटो सौजन्य – istock)
शरीराच्या कोणत्याही अवयवाला अचानक आलेली सूज कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा रस काढून सेवन करण्यास दिला जातो. यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. त्वचेमध्ये वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा रस प्यावा. यामुळे जखमा लवकर भरतात. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली तुळशीचे पाने शरीरातील गंभीर आजारांपासून सुटका मिळवून देतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेवर वाढलेला रेडनेस कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा लेप लावावा.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी, खोकला किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्या उद्भवू लागल्यास तुळशीच्या काढ्याचे सेवन करावे. हा काढा शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतो. घशात वाढलेली खवखव दूर करण्यासाठी तुळशीच्या काढ्याचे सेवन करावे. दमा, श्वसनमार्गातील अडथळे दूर करण्यासाठी तुळशीच्या काढ्याचे सेवन करावे. यामुळे भूक सुधारते. काढा तयार करताना एक ग्लास पाण्यात तुळशीची पाने टाकून उकळवून घ्या. त्यानंतर त्यात आलं, काळीमिरी टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. तयार केलेला काढा गाळून त्यात मध मिक्स करून सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. पचनाच्या समस्या वाढू लागल्यास तुळशीच्या काढ्याचे सेवन करावे.
अभिनेत्री प्रिया मराठेच कॅन्सरमुळे ३८ व्या वर्षी निधन, २५ वयानंतर महिलांमध्ये दिसून येतात ही लक्षणे
साथीच्या आजारांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. अशावेळी तुळशीच्या पानांचे सेवन करावे. यामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्स नष्ट करतात आणि निरोगी पेशी वाढवण्यासाठी मदत करतात. शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल किंवा आरोग्यासंबंधित समस्यांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी तुळशीचे पान प्रभावी ठरते. पोटदुखी, डोकेदुखी किंवा मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर केला जातो.