केस खूप जास्त कोरडे झाले आहेत? मग दह्याचा वापर करून घरीच तयार करा हेअर मास्क, केस दिसतील सुंदर
सर्वच महिलांना लांबलचक, मजबूत आणि चमकदार केस हवे असतात. केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी कायमच शाम्पू, कंडिश्नरमध्ये बदल केला जातो. तर काहीवेळा हेअर सीरम आणि हेअर केअर रुटीनमध्ये सुद्धा बदल केले जातात. हल्ली सोशल मीडियावर ग्लास स्किनसोबतच ग्लास हेअरचा मोठा ट्रेंड सुरु आहे. मऊ, रेशमी आणि काचेसारखे चमकणारे केस प्रत्येक महिलेला हवे आहेत. केसांचा लुक सुंदर आणि चमकदार दिसावा म्हणून बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर ट्रीटमेंट सुद्धा करून घेतल्या जातात. पण हेअर ट्रीटमेंट केल्यानंतर काही काळापुरतेच केस अतिशय सुंदर आणि चमकदार दिसतात. पण कालांतराने पुन्हा एकदा केस होते तसेच होऊन जातात आणि केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
केस चमकदार दिसावे म्हणून वारंवार केमिकल प्रॉडक्टचा वापर केसांसाठी करणे अजिबात योग्य नाही. यामुळे केसांच्या मुळांना हानी पोहचते आणि केसांची वाढ थांबते. त्यामुळे केस चमकदार आणि सुंदर दिसावे यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर केसांसाठी करावा. यामुळे केस अतिशय सुंदर दिसतात. केसांवर केलेल्या केमिकल प्रक्रियेमुळे केस अधिक रुक्ष, कोरडे आणि कमकुवत होऊन जातात. आज आम्ही तुम्हाला दह्याचा वापर करून हेअर मास्क बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा हेअर मास्क आठवड्यातून एकदा केसांवर लावल्यास केसांची गुणवत्ता सुधारण्यासोबतच केस मऊ आणि चमकदार होतील.
मसाज केल्यामुळे केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळेल आणि रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. १० ते १५ मिनिटं हेअर मास्क केसांवर तसाच ठेवून द्या. त्यानंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. केस धुवताना सौम्य शाम्पूचा वापर करावा. केसांवर दही लावल्यामुळे केस मऊ आणि मुलायम होतात. याशिवाय टाळूमध्ये वाढलेला कोंडा कमी होण्यास मदत होते. केसांच्या गुणकारी वाढीसाठी आणि केस कायमच स्वच्छ राहावे, म्हणून बाजारात उपलब्ध असलेले केमिकल प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा.
Ans: दह्यामध्ये प्रथिने आणि फॅट्स असतात. त्यामुळे दह्याचा हेअर मास्क केसांना कंडिशनिंग मिळण्यास आणि कोरडेपणा व रफनेस कमी जाणवण्यास मदत करू शकतो.
Ans: ताजे, साधे दही घेऊन ते चांगले फेटून केसांच्या लांबीवर आणि टोकांवर लावता येते. इच्छेनुसार त्यात थोडे खोबरेल तेल मिसळू शकता. काही वेळ ठेवून सौम्य शॅम्पूने केस धुवावेत.
Ans: साधारण 20–30 मिनिटे दही केसांवर ठेवणे पुरेसे असते. जास्त वेळ ठेवण्याची आवश्यकता नाही.






