वातावरणातील बदलांमुळे त्वचा टॅन झाली आहे? मग घरच्या घरी करा बटाटा फेशिअल, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो
बटाट्याच्या रसाचे फायदे?
नॅचरल स्क्रब बनवण्याची कृती?
पावसाळ्यात त्वचेच्या समस्या का वाढतात?
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराच्या ज्याप्रमाणे काळजी घेतली जाते तशीच काळजी त्वचेची सुद्धा घेतली जाते. कारण वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे त्वचा खूप जास्त तेलकट आणि चिकट होऊन जाते. त्वचा तेलकट झाल्यानंतर वेळीच स्वच्छ न केल्यास त्वचेच्या समस्या आणखीनच वाढू लागतात आणि चेहऱ्यावरील ग्लो नष्ट करतात. चेहऱ्यावरील नॅचरल चमक वाढवण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतात. फेशिअल, क्लीनअप तर काहीवेळा त्वचेच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट सुद्धा करून घेतल्या जातात. पण वारंवार केमिकल युक्त स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते.(फोटो सौजन्य – istock)
Skin Care च्या नावाखाली केलेली एक चूक त्वचेसाठी ठरेल घातक! ‘या’ लोकांनी चुकूनही लावू नका फेसपॅक
त्वचेवर आलेले पिंपल्स, टॅनिंग आणि इतर समस्या कमी करण्यासाठी कायमच महागड्या प्रॉडक्टचा वापर करू नये. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांमध्ये असलेले आवश्यक गुणकारी घटक त्वचा आतून सुंदर करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेवर आलेले काळे डाग घालवण्यासाठी बटाटा फेशिअल करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. बटाट्यात असलेले आवश्यक गुणकारी घटक त्वचेवरील टॅन कमी करण्यासोबतच त्वचा आतून सुंदर आणि चमकदार करतात. चला तर जाणून घेऊया बटाटा फेशिअल करण्याची सोपी पद्धत.
ही, कॉफी, खोबरेल तेल, लिंबाचा रस आणि बटाट्याचा रस इत्यादी पदार्थांचा वापर करून बटाटा फेशिअल केले जाते. कायमच स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर त्वचेसाठी करावा. फेस स्क्रब तयार करण्यासाठी वाटीमध्ये दही घेऊन त्यात कॉफी पावडर, खोबरेल तेल, लिंबाचा रस आणि कच्च्या बटाट्याचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल आणि त्वचा अधिक सुंदर दिसेल. फेस स्क्रब करून झाल्यानंतर १० मिनिट ठेवून नंतर प[पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या. हा फेस स्क्रब आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा लावल्यास चेहऱ्यावर फेशिअल सारखा ग्लो येईल.
दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड त्वचा एक्सफोलिएट करण्यास मदत करते. याशिवाय चेहऱ्यावर जमा झालेल्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी दही फायदेशीर ठरते. त्वचेला नैसर्गिक मॉइश्चरायझेशन देण्यासाठी दह्याचा वापर करावा. कॉफी त्वचेसाठी एक उत्तम नैसर्गिक स्क्रब आहे. कॉफीच्या वापरामुळे त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होते. खोबरेल तेल त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवते. बटाट्याच्या रसामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेवरील डार्क सर्कल, चेहऱ्यावरील डाग, पिंपल्सचे मुरुम आणि टॅनिंग कमी होण्यास मदत होते.
Ans: बटाट्यामध्ये पाण्याचे प्रमाण आणि काही अँटिऑक्सिडंट घटक असतात. बटाट्याचा वापर त्वचेला तात्पुरता फ्रेश आणि मऊ लूक देऊ शकतो; मात्र टॅन कायमचा दूर करण्यासाठी याचा ठोस वैज्ञानिक पुरावा मर्यादित आहे.
Ans: कच्चा बटाटा स्वच्छ धुऊन त्याचा रस काढू शकता. तो चेहऱ्यावर हलक्या हाताने लावून काही मिनिटांनी पाण्याने धुवावा. त्वचेवर जळजळ किंवा खाज जाणवल्यास त्वरित धुवून वापर थांबवावा.
Ans: नाही. घरगुती बटाटा फेशिअल टॅन पूर्णपणे काढून टाकतो असे सिद्ध झालेले नाही. सूर्यप्रकाशामुळे होणारे टॅन कमी करण्यासाठी नियमित broad-spectrum sunscreen वापरणे अधिक महत्त्वाचे आहे.






