(फोटो सौजन्य – Pinterest)
आज १९ नोव्हेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन (International Mens Day) साजरा केला जात आहे. हा दिवस पुरुषांना समर्पित असून आपल्या आयुष्यातील आपला प्रियकर असो, भाऊ असो वा वडील तुम्ही या दिवशी त्यांना एक खास भेटवस्तू गिफ्ट करू शकता. गिफ्ट हे नेहमीच खरेदी करता येत नाही तर ते कधीकधी घरी बनवताही येते. पुरुष दिनाच्या या खास प्रसंगी आज आम्ही तुमच्यासाठी एक अनोखी पण चविष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसिपीने तुम्ही तुमच्या आयुष्यातील आवडीच्या पुरुषांना खुश करू शकता.
भारतीय पाककलेत दूध, दही, पनीर, मैदा, बेसन यांसारख्या साध्या पण पौष्टिक पदार्थांपासून तयार होणाऱ्या असंख्य रुचकर रेसिपी आढळतात. उत्तर भारतातील अनेक राज्यांत बनवला जाणारा दही के शोले हा असा एक लोकप्रिय स्टार्टर आहे, जो चवीला कुरकुरीत, आतून नरम आणि दह्याच्या ताजेपणामुळे हलका वाटतो. दही, भाज्या व मसाल्यांचा विलक्षण संगम आणि बाहेरून तळलेली कुरकुरीत आवरण ही त्याची विशेष ओळख. हे स्टार्टर पार्ट्या, सण, घरगुती समारंभ किंवा खास पाहुण्यांसाठी बनवले तरी उत्तम ठरते.
शोले नाव असूनही ही डिश अत्यंत सौम्य आणि सुगंधी चवीची असते. तोंडात विरघळणारे दही आणि भाज्यांची भुरभुरीत चव, त्यावर मिळणारा गरमागरम तळलेला पोत हा अनुभव नक्कीच प्रत्येकाला आवडतो. घरी बनवताना स्वच्छ साहित्य, ताजे दही आणि योग्य प्रमाणात मसाले वापरल्यास रेस्टॉरंटसारखा कुरकुरीत आणि स्वादिष्ट परिणाम मिळतो. या डिशचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती अगोदर तयार करून ठेवता येते व सर्व्ह करताना फक्त तळायची, यामुळे ती घरगुती समारंभात खूप उपयोगी ठरते.
साहित्य
कृती






