वाढत्या थंडीमध्ये घरी बनवा गरमागरम पालक सूप
देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं काहींना काही गरमागरम आणि झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती काहीशी कमी होऊन जाते. शरीरात थकवा, अशक्तपणा वाढू लागल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. थंडीत प्रत्येक घरात कोणत्या ना कोणत्या भाजीपासून किंवा चिकन सूप बनवले जाते. सूप प्यायल्यामुळे शरीरात उबदारपणा कायम टिकून राहतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गरमागरम पालक सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी पालक अतिशय फायदेशीर आहे. पालक खाल्ल्यामुळे शरीरात कधीही रक्ताची कमतरता जाणवत नाही. रोजच्या आहारात नियमित एक पालेभाजी खावी. पालकमध्ये असलेल्या लोहामुळे शरीरात निर्माण झालेली हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघते आणि शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवत नाही. चला तर जाणून घेऊया गरमागरम पालक सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Men’s Day 2025 : घरातील पुरुषांना करा खुश, खास दिनानिमित्त घरी बनवा युपीची फेमस डिश ‘दही के शोले’






