हिरव्या रंगाची वेलची खाल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे
मागील अनेक वर्षांपासून औषधी पदार्थांमध्ये वेलचीचा वापर केला जात आहे. गोड पदार्थासोबतच मसाल्यांमधील पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा वेलचीचा वापर केला जातो. बाजारात हिरव्या रंगाची सुगंधी वेलची आणि मसाला वेलची अशा दोन प्रकारच्या वेलच्या उपलब्ध आहेत. त्यातील हिरव्या रंगाची वेलची गोड पदार्थ बनवण्यासाठी वापरली जाते. जेवणात वेलची टाकल्यानंतर पदार्थाच्या सुगंधासोबतच चवही खूप सुंदर लागते. अनेक लोक झोपताना तोंडामध्ये वेलची ठेवून झोपतात. याने आरोग्याला अनेक फायदे होतात, असे म्हंटले जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वेलची खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
हिरव्या रंगाची औषधी वेलची खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. रात्री झोपण्याआधी वेलचीचे एक किंवा दोन तुकडे तोंडामध्ये ठेवून चघळत राहावे. ज्यामुळे तोंडातील दुर्गंधी निघून जाईल आणि वास येणार नाही. तोंडात टाकलेले वेलचीचे तुकडे गिळू नये. रात्रभर वेलची तोंडात तशीच ठेवून द्यावी. सकाळपर्यँत वेलची तोंडात ठेवल्यामुळे वेलचीचा संपूर्ण अर्क पोटात जाईल आणि तोंडामध्ये सुगंधी वास येईल.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली वेलची खाल्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आढळून येतात. ज्यामुळे हृदयविकाराचा किंवा हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत होते. शिवाय वेलचीचे सेवन केल्यामुळे शरीरातील रक्त पातळ होण्यास मदत होते. त्यामुळे रात्री झोपण्याआधी नियमित एक वेलची चघळत राहावी.
वेलचीचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. पोटात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. या विषारी पदार्थांमुळे त्वचेवर पिंपल्स येतात. तसेच शरीरातील सर्व उष्णता बाहेर पडू लागते. त्यामुळे रात्री झोपण्याआधी वेलची चघळत राहावी. ज्यामुळे पोटात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. गॅस, अपचन आणि पोटफुगीची समस्या कमी होईल.
लाईफस्टाईल संबधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
किडनीचे कार्य सुरळीत चालू ठेवण्यासाठी आणि किडनीच्या निरोगी आरोग्यसाठी वेलचीचे सेवन करावे. वेलची शरीर डिटॉक्स करण्याचे काम करते. शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी वेलची अतिशय प्रभावी आहे. शिवाय मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात वेलचीचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहील.






