फोटो सौजन्य: iStock
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपली लाइफस्टाइल वेगाने बदलत आहे. यामुळे अनेक आजार फैलावत आहे. तसेच हार्ट अटॅकचा धोका सुद्धा वाढताना दिसत आहे. आज फक्त जेष्ठ नाही तरुण सुद्धा हार्ट अटॅकचे शिकार होत आहे.
हार्ट अटॅक नेहमीच कोलेस्टेरॉल, रक्तदाब किंवा मधुमेहाशी जोडला जातो. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की Vitamin D ची कमतरता देखील हार्ट अटॅकचे एक प्रमुख कारण असू शकते. या विषयावर, डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की जर शरीरातव्हिटॅमिन डी जीवनसत्व कमी झाले तर त्याचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो.
Horror Story: श्श्श्श… मागे कुणीतरी आहे! भाजलेले शरीर… उलट्या पायाची ‘ती’, समोर पाहताच…
व्हिटॅमिन डीला “सनशाईन व्हिटॅमिन” म्हणून ओळखले जाते. हे शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरसचे संतुलन राखते, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात. मात्र त्याचा परिणाम फक्त हाडांवरच नाही तर हृदयाच्या आरोग्यावरही होतो. ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असते, त्यांना हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो.
शरीरात व्हिटॅमिन डी कमी झाल्यास रक्तदाब असंतुलित होतो आणि धमन्यांमध्ये सूज येते. या अवस्थेमुळे हळूहळू हृदयविकार उद्भवू शकतो.
हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी वेळोवेळी व्हिटॅमिन डीची पातळी तपासणे आवश्यक आहे. कमतरता आढळल्यास त्वरित उपचार सुरू करावेत. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीत बदल करूनच हृदयाचे आरोग्य टिकवून ठेवता येते.