खोकल्यासाठी लवंगचा वापर कसा करावा
हिवाळ्यामध्ये वातावरणात सतत काहींना काही बदल होत असतात. वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सर्दी, खोकला, ताप इत्यादी साथीचे आजार वाढू लागल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. सर्दी खोकल्याची समस्या वाढू लागल्यानंतर काहीवेळा डॉक्टरांच्या गोळ्या औषधांनी सुद्धा आराम मिळत नाही. अशावेळी घरगुती उपाय करून आराम मिळवण्याचा प्रयत्न करावा. घरगुती उपाय शरीरासाठी अधिक प्रभावी आहे. छातीमध्ये जमा झालेल्या कफामुळे छातीत दुखू लागल्यास स्वयंपाक घरातील मसाल्याचा वापर करा. लवंगचा चहा किंवा पाणी बनवून प्याल्यास छातीमध्ये जमा झालेला कफ मोकळा होऊन, छातीमधील दुखण्यापासून आराम मिळेल.(फोटो सौजन्य – iStock)
आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा ‘या’ रसाचे सेवन
लवंगमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. या मसाल्याचा वापर प्रामुख्याने पुलाव किंवा तिखट पदार्थ बनवताना केला जातो. चवीला तिखट असलेली लवंग आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आणि फायदेशीर आहे. लवंगचे नुसतेच सेवन न करता तुम्ही तुपासोबत लवंग खाल्यास सर्दी, खोकला कमी होऊन आराम मिळेल. लवंगामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया लवंग आणि तुपाचे एकत्र सेवन केल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे.
सर्दी किंवा खोकला वाढू लागल्यानंतर तूप गरम करून त्यात लवंग गरम करून खा. यामुळे छातीमध्ये जमा झालेला कफ कमी होऊन छातीच्या दुखण्यापासून आराम मिळेल. तूप खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हिवाळ्यामध्ये तुपात शिजवलेला लवंग खाल्यामुळे आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळतो. तुपात शिजवलेला किंवा भाजलेला लवंग आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
सर्दी, खोकला आणि आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तूप आणि लवंगचे सेवन करावे. यासाठी तूप गरम करून त्यात 5 ते 6 लवंग भाजून घ्या. त्यानंतर थंड करून तुम्ही लवंगाचे सेवन करू शकता. यामध्ये युजेनॉल नावाचा घटक आढळून येतो. ज्यामुळे छातीत जमा झालेला कफ पातळ होऊन बाहेर पडून जातो. याशिवाय तुम्ही लवंग तेलाचा सुद्धा वापरू करू शकता. लवंग तेलाचा वास घेतल्यामुळे छातीमध्ये जमा झालेला कफ मोकळा होतो.
रक्तवाहिन्यांमध्ये चिटकून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी प्रभावी ठरेल लसूणची एक पाकळी, ‘या’ पद्धतीने करा सेवन
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित एक चमचा तुपाचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. याशिवाय साथीच्या आजारांमुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्वचेवर आलेले मुरूम, फोड, सुरकुत्या दूर करण्यासाठी नियमित तुपाचे सेवन करावे. रोजच्या आहारात एक चमचा तूप खाल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि आरोग्यासंबंधित समस्या दूर होतात.