भारतीय मराठमोळ्या पारंपरिक दागिन्यांना विशेष महत्व आहे.सर्वच महिला रोजच्या वापरात आवर्जून कानातले परिधान करतात. कानातल्यांशिवाय त्वचेचे सौंदर्य खुलून दिसत नाही. त्यातील अतिशय लोकप्रिय प्रकार म्हणजे झुमका कानातले. झुमका कानातले प्राचीन काळापासून नाहीत, तर शतकानुशतके आहेत. झुमका कानातले घातल्यानंतर सुंदर पारंपरिक लुक दिसतो. आज आम्ही तुम्हाला झुमका कानातल्यांचा रंजक इतिहास सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
चोल राजवंशापासून सुरु झालेल्या झुमका कानातल्यांच्या प्रवासाला मुघलांनी दिली नवी ओळख, वाचा रंजक इतिहास

"झुमका" या शब्दाचा अर्थ घंटा असा होतो. घंटेच्या आकार आणि कानातल्यांमधून येणाऱ्या आवाजामुळे दागिन्यांला झुमका असे नाव पडले. डोकं हलवताना झुमकांची हालचाल आणि आवाज इतर दागिन्यांपेक्षा वेगळा असतो. अजूनही पारंपारिक झुमकांमध्ये घंटेसारखा आकार अजूनही दिसून येतो.

झुमका कानातल्यांना प्राचीन इतिहास लाभला आहे. त्यात असे मानले जाते की हा इतिहास चोल राजवंशापासून, सुमारे ३०० ईसापूर्व पर्यतचा आहे. दक्षिण भारतीय मंदिरांमधील देवतांच्या मूर्ती कानातल्यांनी सजवल्या जात होत्या. हे अलंकार देवतांबद्दल आदर आणि देवत्वाचे प्रतीक होते.

पारंपरिक दागिन्यांची वारसा पुढे नेत मंदिरातील नर्तकांनी, विशेषतः भरतनाट्यम नर्तकांनी कानातले घालायला सुरुवात केली. नृत्यादरम्यान कानातल्यांची लयबद्ध हालचाल आणि चमक नृत्याचे सौंदर्य वाढते, असे मानले जायचे.

राजेशाही आणि खानदानी महिलांमध्ये कानातले लोकप्रिय होते. जड दागिन्यांकडे कल असूनही, कानातले पोकळ असल्याने त्यांना विशेष मान दिला जायचा. मुघल काळात, कानातले अधिक तेजस्वी झाले होते. कारण "कानफूल" आणि "संकली" यांचा ट्रेंड सुरु झाला. त्यात कानातले केसांच्या सजावटीसाठी सुद्धा वापरले जायचे.

मोत्याच्या तारा, न कापलेले हिरे आणि सोन्याच्या कोरीवकामामुळे झुमका कानातले शाही टच देऊन बनवण्यात आले. टेम्पल झुमके, कुंदन झुमके, मीनाकारी झुमके, ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर झुमके आणि पर्ल झुमके इत्यादी अनेक वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कानातले उपलब्ध आहेत.






