अॅसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय
चुकीची जीवनशैली, सतत बाहरेच्या तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन, कामाचा तणाव, अपुरी झोप, बिघडलेले मानसिक आरोग्य इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शारीरिक आरोग्यावर दिसून येतो. झोप पूर्ण न झाल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. शिवाय शरीरात निर्माण झालेला शारीरिक हालचालींचा अभाव आणि योग्य वेळी न जेवल्यामुळे शरीरात अनेक बदल होऊ लागतात. यामुळे अनेकांना अॅसिडिटीचा त्रास होऊ लागतो. अॅसिडिटी वाढल्यानंतर पोटात दुखणे, अस्वस्थ वाटणे, खाण्यापिण्याची इच्छा न होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. तर अनेकांना अॅसिडिटी वाढल्यानंतर डोके दुखणे किंवा पित्ताचा त्रास होण्यास सुरुवात होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली अॅसिडिटी कमी करण्यासाठी कोणत्या पांढऱ्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. पांढऱ्या पेयांचे सेवन केल्यामुळे अॅसिडिटीची समस्या कमी होऊन आराम मिळेल. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
चवीला आंबट गोड असलेले दह्याचे ताक आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. अॅसिडिटी झाल्यानंतर सगळ्यात आधी ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्यामुळे अॅसिडिटी झाल्यावर हिंग घातलेले ताक प्यावे, ज्यामुळे अॅसिडिटीचा त्रास कमी होईल. हिंग घालून ताक तयार करण्यासाठी ताकामध्ये चिमूटभर हिंग मिक्स करून प्यावे. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. हिंग पोटाला आलेली सूज आणि वेदना कमी करण्यासाठी मदत करते.
मागील अनेक वर्षांपासून पोटासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ओव्याच्या पाण्याचे सेवन केले जात आहे. ओवा खाल्यामुळे पोटासंबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. त्यामुळे गरम पाण्यात ओवा टाकून व्यवस्थित उकळवून घ्यावा. त्यानंतर तयार केलेले पाणी प्यावे. यामुळे अॅसिडिटीचा त्रास कमी होऊन पोटात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होईल. शिवाय ओव्यामध्ये आढळून येणारे अँटीऑक्सिडंट्स पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात.
शरीराला थंडावा देण्यासाठी खसखसचे पाणी प्याले जाते. तसेच अॅसिडिटी किंवा पोट दुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर खसखसचे पाणी प्यावे. यामुळे अॅसिडिटीपासून सुटका मिळेल. खसखसचे पाणी तयार करण्यासाठी पाण्यात अर्धा चमचा खसखस भिजत ठेवावी. रात्रभर खसखस पाण्यात भिजल्यानंतर सकाळी उठून पाणी प्यावे. यामुळे पोट स्वच्छ होईल आणि पचनक्रिया निरोगी राहील.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीर स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. पोटात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतात. यामुळे अॅसिडिटी वाढते. अॅसिडिटी वाढू नये म्हणून गरम पाण्यात आलं टाकून व्यवस्थित उकळवून घ्यावे. त्यानंतर पाणी गाळून त्यात लिंबाचा रस मिक्स करून घ्या. यामुळे अॅसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होईल.