गुटखा खाऊन सडलेले दात स्वच्छ करण्यासाठी दातांवर घासा 'हा' गोड पदार्थ
दैनंदिन आहारात सतत कोणत्या ना कोणत्या चिकट किंवा अतितेलकट पदार्थाचे सेवन केल्यामुळे दातांचे आरोग्य खराब होऊन जाते. दात खराब झाल्यानंतर ते सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. दातांवर वाढलेला पिवळेपणा, पांढरा थर किंवा तंबाखू गुटखा खाऊन खराब झालेले दात सुधारण्यासाठी महिलांसह पुरुष सुद्धा सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी बाजारातील वेगवेगळ्या टूथपेस्ट लावल्या जातात तर कधी डॉक्टरांच्या सल्ल्याने अनेक वेगवेगळे उपाय केले जाते.दातांच्या ट्रीटमेंट केल्यानंतर दात काहीकाळच सुंदर आणि चमकदार दिसतात. मात्र कालांतराने पुन्हा एकदा दात होते तसेच खराब होऊन जाते.(फोटो सौजन्य – iStock)
पुरुषांना सतत तंबाखू किंवा गुटखा खाण्याची सवय असते. मात्र नेहमी नेहमी गुटख्याचे सेवन केल्यामुळे दात आणि हिरड्यांवर लाल रंगाचा घाणेरडा थर साचून राहतो, ज्यामुळे दात अतिशय खराब होतात. दातांचे आरोग्य बिघडल्यानंतर ते सुधारण्यासाठी सतत काहींना प्रयत्न करावे लागतात. आज आम्ही तुम्हाला दातांवर वाढलेला पिवळाथर कमी करण्यासाठी कोणत्या गोड पदार्थाचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थाच्या वापरामुळे दात अंधारातही सुंदर दिसतील.
दातांवर साचून राहिलेला पिवळा थर कमी करण्यासाठी मधाचा वापर करावा. मधाच्या वापरामुळे दात अतिशय स्वच्छ होतात. यामध्ये असलेले आयुर्वेदिक गुणधर्म दात स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. यासाठी रोजच्या वापरातील टूथपेस्ट न वापरता हात आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा दातांवर मध लावून दात स्वच्छ करून घ्या. मध लावून दात हलक्या हाताने घासा. यामुळे तुमचे दात उजळदार होण्यास मदत होईल. मधामध्ये असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मांमुळे तोंडातील दुर्गंधी, जिवाणू नष्ट होतील आणि दात स्वच्छ होण्यास मदत होईल.
बऱ्याचदा हिरड्यांना कीड लागल्यानंतर दातांमध्ये वेदना होऊ लागतात. दातांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी अनेक लोक पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन करतात. मात्र सतत पेनकिलरच्या गोळ्या खाणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे किडनीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे दातांमधील वेदना थांबवण्यासाठी हळद आणि मीठ मिक्स करून दातांमध्ये भरावे. यामुळे वेदना कमी होतील. हळदीमध्ये असलेले अँटीसेप्टिक दातांवरील डाग, काळेपणा घालवण्यासाठी मदत करतील.
ऑईल पुलिंग केल्यामुळे दातांसह संपूर्ण तोंडाला अनेक फायदे होतील. दातांवर साचून राहिलेल्या पिवळ्या थरामुळे तोंडात दुर्गंधी वाढू लागते. तोंडात वाढलेल्या दुर्गंधीमुळे बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जाते. अशावेळी दात स्वच्छ करण्यासाठी ऑईल पुलिंग करावे. यासाठी चमचाभर तेल तोंडात घेऊन ५-१० मिनिटं धरून ठेवा आणि त्यानंतर थुकून टाकावे. हा उपाय नियमित केल्यामुळे तोंडातील टॉक्सिन्स बाहेर पडून जातील आणि दात स्वच्छ होण्यास मदत होईल.