नसांमध्ये साचलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी, रोजच्या आहारात करा 'या' फळांचे सेवन
मानवी शरीरात नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल तयार होते. त्यात दोन प्रकारे कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल, दुसरे म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. यामुळे शरीरात निरोगी पेशी तयार होतात. याशिवाय चांगल्या कोलेस्टरॉलमुळे शरीराला अनेक फायदे होतात. मात्र शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. दैनंदिन आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर शरीरात पिवळ्या रंगाचा चिकट घाणेरडा थर जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात वाढलेल्या खराब कोलेस्टरॉलमुळे संपूर्ण आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर लठ्ठपणा, हृदयविकार, रक्तदाब वाढणे, ब्लॉकेजे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला नैसर्गिक फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स आणि पेक्टिन इत्यादी अनेक घटक आढळून येतात.
केळी खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. केळ्यांमध्ये असलेले पोटॅशियम शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात नियमित केळी खावी. शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात नियमित केळी खावी. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित एक केळ खावं.
सफरचंद खाणे आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. डॉक्टरांकडे गेल्यानंतर सुद्धा डॉक्टर सुद्धा नियमित सफरचंद खावे. यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळून येते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते आणि शरीरात सकारात्मक बदल दिसून येतात.
केळीची साल आहेत खूप उपयुक्त, तुमच्या त्वचेला मिळतील खूप फायदे
रोजच्या आहारात विटामिन सी युक्त पपईचे सेवन करावे. यामध्ये असलेले फायबर आणि विटामिन सी शरीराला पोषण देते. याशिवाय पपई खाल्यामुळे शरीरात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाते, ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पपईमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर्स आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात नेहमीच पपई खावी.