पांढरे केस होतील कायमचे काळेभोर आणि मजबूत! 'या' हिरव्या पानांचा वापर करून घरीच तयार करा आयुर्वेदिक हेअर मास्क
केस पांढरे होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. कारण हल्ली तरुण वयातील मुलांमुलींपासून ते अगदी वयस्कर व्यक्तींपर्यंत प्रत्येकाचे केस पांढरे होतात. केस पांढरे झाल्यानंतर ते काळे करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. कधी हेअर कलर केले जातात तर कधी हेअर डाय लावला जातो. पण हेअर कलर किंवा डाय केल्यानंतर महिनाभरात केस पुन्हा एकदा पांढरे होतात आणि केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. वारंवार केमिकल युक्त हेअर कलरचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होते आणि केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळत नाही. केमिकल युक्त हेअर प्रॉडक्ट केसांची नैसर्गिक पोत पूर्णपणे खराब करून टाकतात. त्यामुळे सतत केमिकल असलेल्या प्रॉडक्टचा वापर केसांसाठी करू नये.(फोटो सौजन्य – istock)
वयाच्या तिशीमध्ये केस पांढरे झाल्यानंतर महिलांचा आत्मविश्वास काहीसा कमी होऊन जातो. कारण तरुण वयात केस काळेभोर, मजबूत असण्याऐवजी केस पांढरे होऊन जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसांच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या हिरव्या पानांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. कडुलिंबाची हिरवीगार पाने केसांची मूळ मजबूत करतात आणि केसांची गुणवत्ता सुधारतात. केस काळे करण्यासाठी हेअर कलर वापरण्याऐवजी कडुलिंबाच्या पानांचा हेअर मास्क बनवून केसांवर लावावा. यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा, इन्फेक्शन कमी होण्यास मदत होईल.
केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे कडुलिंबाच्या पानांची पेस्ट ६ महिने लावल्यास केस मजबूत होण्यास मदत होईल. याशिवाय केस पांढरे होणार नाहीत. नैसर्गिक पद्धतीचा वापर केसांसाठी केसल्यास केसांना कोणतीही हानी पोहचणार नाही. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कडुलिंबाच्या पानांचा हेअर मास्क लावावा. कायमच बाजारातील हेअर मास्क वापरण्याऐवजी घरी बनवलेल्या हेअर मास्कचा वापर करावा. कडुलिंबाच्या पानात असलेले घटक केसांची गुणवत्ता सुधारतात.
हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, कडुलिंबाची पाने कडक वाळवून घ्या. सुकलेली पाने मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पावडर तयार करा. त्यानंतर त्यात केलेली पावडर वाटीमध्ये घेऊन त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्टसर मिश्रण बनवा आणि केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर ३० मिनिटं ठेवून केस नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून एकदा कडुलिंबाच्या पानांचा हेअर मास्क केसांवर लावल्यास केसांच्या मुळांना भरपूर पोषण मिळेल आणि केस सुंदर होतील.






