पुरूषांमधील वंध्यत्वाची समस्या
वंध्यत्व ही जागतिक आरोग्य समस्या ठरली आहे जी जगभरातील लाखो जोडप्यांमध्ये पहायला मिळते. वंध्यत्वासारख्या समस्येस केवळ स्त्रियांना दोषी ठरविले जाते मात्र पुरषांमध्येही वंधत्वाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जवळजवळ 50% पुरुषांमध्ये वंधत्वाची समस्या सतावते. पुरुष वंध्यत्वास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांपैकी हार्मोन असंतुलन हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
पुनरुत्पादक औषधांमधील प्रगती अशा समस्येला योग्य प्रकारे हाताळण्याची विशेष उपचार योजना आखावी लागते. डॉ. प्रदीप महाजन, रीजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट आणि स्टेमआरक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
हार्मोनल असंतुलन समजून घेताना
हार्मोनल असंतुलन म्हणजे काय
पुरुषांच्या शरीरात काही हार्मोन्सचा संतुलन खूप महत्वाचा असतो. ग्रोथ हार्मोन, टेस्टोस्टेरॉन आणि कोर्टिसोल हे पुरुषांसाठी खूप महत्वाचे हार्मोन्स मानले जातात, जे शरीरात या हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी आवश्यक असतात. हार्मोनल असंतुलन असल्यास लैंगिक इच्छा कमी होणे,लिंग ताठरता न येणे(इरेक्टाईल डिसफंक्शन),स्पर्म काउंट कमी असणे, शरीरावरील केस कमी होणे अशा समस्या उद्भवतात.
हेदेखील वाचा – 100 च्या वेगाने फर्टिलिटी वाढवतील 5 पदार्थ, पुरूषांसाठी ठरतील वरदान
पुरुषांमधील हार्मोनल असंतुलनात कारणीभूत घटक
कोणते घटक ठरतात कारणीभूत
हार्मोनल असंतुलन आणि किजनरेटिव्ह मेडिसिन
रीजनरेटिव्ह मेडिसिनमध्ये शरीराच्या स्वतःच्या उपचार पद्धतींचा वापर करून खराब झालेल्या ऊती आणि अवयवांच्या दुरुस्ती केली जाते. हार्मोनल असंतुलनामुळे गर्भधारणा होऊ न शकणाऱ्या पुरुषांवर उपचार करण्यासाठी सेल बेस थेरपीने उपचार करणे प्रभावी ठरते.
डॉ. प्रदीप महाजन सांगतात की, आम्ही स्टेम सेल्सचा वापर करून हार्मोनल असंतुलन असलेल्या पुरुषांमध्ये सामान्य हार्मोनल संतुलन पुनर्संचयित करू शकतो. उदाहरणार्थ, MSCs (मेसेन्कायमल स्टेम सेल्स) चा वापर खराब झालेले टेस्टिक्युलर टिश्यू पुन्हा निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो ज्यामुळे टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन आणि शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते.
हेदेखील वाचा – पुरूषांमधील वंध्यत्व: भारतात वाढतेय चिंता, WHO ने दिला इशारा
प्रजनन क्षमतेसाठी थेरपी
कोणत्या थेरपीचा करावा वापर
प्लेटलेट-रिच प्लाझ्मा (पीआरपी) थेरपी हीदेखील प्रभावी ठरत असून रुग्णाच्या स्वतःच्या रक्तातून प्लाझ्मा पेशीचा वापर केला जातो आणि त्यात वाढीचे घटक असतात जे ऊतींची दुरुस्ती आणि पुनरुत्पादनास मदत करतात. डॉ. महाजन सांगतात की, पीआरपी थेरपीद्वारे वृषणाचे कार्य सुधारता येते यामुळे प्रजनन क्षमता वाढू शकते.
हार्मोनल मॉड्युलेशन
हार्मोनल असंतुलन सुधारण्यासाठी बायोआइडेंटिकल हार्मोन्सच्या वापराचे परीक्षण केले जाते. डॉ. महाजन सांगातत, हार्मोन्सचे संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी तसेच पुनरुत्पादनास अनुकूल करण्यासाठी बायोआइडेंटिकल हार्मोन रिप्लेसमेंट वैयक्तिकृत केले जाऊ शकते.
पुनरुत्पादक औषधाचे क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे. यामुळे पुरुष वंध्यत्वावर प्रभावी उपचारांचा वेगवान विकास होऊ शकतो आणि जोडप्यांचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते तसेच जीवनशैली सुधारु शकते.पुरुष वंध्यत्व हे सहसा मोठ्या हार्मोनल असंतुलनामुळे उद्भवते ज्याकडे सामान्यतः दुर्लक्ष केले जाते. या समस्येचा सामना करण्यासाठी, पुनरुत्पादक औषधामध्ये शरीराच्या नैसर्गिक उपचार क्षमतांचा वापर करण्याची क्षमता आहे.