(फोटो सौजन्य: Pinterest)
“दिवाळी म्हटली की घराघरात फराळाचा सुगंध दरवळायला लागतो. शंकरपाळे, लाडू, करंजी, चकली, चिवडा… हे पदार्थ म्हणजे आनंदाचा मेजवानी! या सगळ्या फराळामधील एक हलका, खमंग आणि कुरकुरीत पदार्थ म्हणजे कुरमुऱ्यांचा चिवडा. हा चिवडा केवळ चविष्टच नाही तर झटपट तयार होणारा आणि हलका नाश्त्याचा उत्तम पर्याय आहे. गोड आणि तिखट फराळाच्या मधोमध असा हलका चिवडा खाल्ल्यावर मन ताजेतवाने होतं. शिवाय हा पदार्थ दीर्घकाळ टिकतो आणि प्रवासातही सहज नेता येतो.
राजस्थानचा फेमस पदार्थ डाल ढोकाळी कधी चाखली आहे का? चवीसह आरोग्यासाठीही फायदेशीर आहे ही डिश
मुरमुरे चिवडा बनवताना घरभर जो सुवास दरवळतो, तो दिवाळीची खरी चाहूल देतो. तेलात फोडणी देताना मोहरी तडतडते, कढीपत्ता खमंग सुगंध पसरवतो आणि मुरमुरे, शेंगदाणे, डाळे या सगळ्यांच्या एकत्र चवीतून तयार होतो एक परफेक्ट खमंग चिवडा! चला जाणून घेऊया यासाठी लागणारे आवश्यक साहित्य आणि कृती.
साहित्य:
कृती :
कुरमुऱ्यांचा चिवडा हा असा पदार्थ आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. दिवाळीच्या गडबडीतसुद्धा काहीतरी हलकं आणि खमंग हवं असेल तर ही रेसिपी अगदी योग्य पर्याय आहे. एकदा करून पाहा आणि या दिवाळीत घरभर सुगंध पसरवा मुरमुरे चिवड्याचा!