स्किन केअर करताना 'या' चुका करणे टाळा
सर्वच महिलांना आपली त्वचा चमकदार आणि सुंदर हवी असते. मात्र चुकीच्या पद्धतीचे स्किन केअर रुटीन फॉलो केल्यामुळे त्वचा खराब होऊन जाते. महिलांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल असंतुलनामुळे त्वचेवर अनेकदा पिंपल्स किंवा पिगमेंटेशन उठण्यास सुरुवात होते. चेहऱ्यावर पिंपल्स आल्यानंतर ते घालवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या क्रीम्स, घरगुती उपाय, लोशन्स इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. मात्र तरीसुद्धा त्वचेवरील डाग कमी होत नाही. त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि डाग विरहित त्वचेसाठी आहारात बदल करून पौष्टिक आणि विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. ज्यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि उठावदार दिसेल.(फोटो सौजन्य – iStock)
त्वचेवरील हरवलेला ग्लो पुन्हा मिळवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मुलतानी मातीचा वापर,चेहरा दिसेल उजळदार
धावपळीच्या जीवनातून वेळ काढत काही महिला स्किन केअर रुटीन फॉलो करतात तर काहींना त्वचा आणि केसांकडे लक्ष देण्यास अजिबात वेळ नसतो. त्वचेची काळजी घेताना वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी त्वचेला सूट होईल अशाच प्रॉडक्टचा वापर करावा, ज्यामुळे त्वचेमध्ये अनेक सकरात्मक बदल दिसून येतील. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्किन केअर रुटीन फॉलो करताना कोणत्या चुका करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या चुका केल्यास त्वचा अधिक खराब दिसू लागेल.
सुंदर दिसण्यासाठी अनेक महिला भरपूर मेकअप करताना. याशिवाय त्वचेवर वेगवेगळ्या कॉस्मेटिक्सचा वापर करतात. पण त्वचेवर जास्त कॉस्मेटिक्सचा वापर करू नये. तसेच त्वचेला सूट होणाऱ्या प्रॉडक्टचा वापर त्वचेसाठी करावा. अन्यथा त्वचा खराब होण्याची शक्यता असते. त्वचेला लावलेली एखादी क्रीम त्वचेला सूट नाही झाली तर ब्रेकआऊट्स येणे, पिगमेंटेशन येणे, त्वचा लालसर होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.
त्वचेच्या प्रकारानुसार चेहऱ्यावर स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करावा, अन्यथा कोणत्याही चुकीच्या प्रॉडक्टच्या वापरामुळे त्वचा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणीही सांगितलेले किंवा जाहिरात पाहून चुकीचे स्किन केअर प्रॉडक्ट खरेदी करू नये. असे केल्यास त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते.
अनेक महिला त्वचा तेलकट किंवा चिकट होईल म्हणून सनस्क्रिन लावणे टाळतात. पण रोजच्या वापरात इतर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी सनस्क्रिनचा वापर जास्त करावा. उन्हातून कुठंही बाहेर जाताना नियमित सनस्क्रिन लावूनच बाहेर पडावे. हल्लीच्या बिघडलेल्या वातावरणात सनस्क्रिन लावणे आवश्यक आहे.
पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नाही? मग गव्हाच्या पिठाचा ‘या’ पद्धतीने वापर करून त्वचेवर मिळवा चमक
स्किन केअर प्रॉडक्ट निवडल्यानंतर ते लगेच लगेच बदलू नये, अन्यथा त्वचेवर कोणताही फरक दिसून येणार नाही. विकत आणलेलं प्रॉडक्ट कमीत कमी 1 महिनाभर नियमित वापरावे त्यानंतर त्याचे परिणाम त्वचेवर दिसून येतील.