घरच्याघरी स्किन पॉलिशिंग कसे करावे
डिसेंबर महिन्यात सगळीकडे लग्न, साखरपुडा इत्यादी अनेक कार्यक्रम असतात. कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला सुंदर दिसण्यासाठी सतत काहींना काही करत असतात. कधी पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करून घेणे तर कधी बाजरात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. सर्वच महिलांना आपली त्वचा सुंदर, चमकदार आणि गोरीपान असावी असं नेहमीच वाटतं असत. पण काहीवेळा कामामुळे त्वचेकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. यामुळे हळूहळू त्वचेची गुणवत्ता खराब होण्यास सुरुवात होते. सतत बाहेरच्या तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे त्वचेवर पिंपल्स येणे, फोड येणे, मुरूम येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर हळूहळू त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
वातावरणात सतत होणारे बदल, धूळ, माती, प्रदूषणामुळे त्वचा खराब होऊ लागते. खराब झालेली त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. प्रदूषणामुळे त्वचेवर घाण तशीच साचून राहते. चेहऱ्यावर डेड स्किन जमा झाल्यानंतर चेहरा अस्वच्छ दिसू लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला त्वचेवरील टॅन घालवण्यासाठी घरगुती पद्धतीने लेप तयार करण्याची कृती सांगणार आहोत. यामुळे तुमची त्वचा उजळण्यास मदत होईल आणि चेहऱ्यावर फेशिअल ग्लो येईल. स्किन पॉलिशिंग केल्यामुळे त्वचा स्वच्छ होते.
स्किन पॉलिशिंग केल्यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाऊन त्वचा उजळण्यास मदत होते. त्वचेवर जमा झालेली घाण स्वच्छ होऊन त्वचा उजळदार आणि सुंदर दिसू लागेल. त्वचा पॉलिशिंगसाठी या पद्धतीने तयार करा घरगुती लेप.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
नैसर्गिक पदार्थांपासून तयार केलेला लेप त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचा उजळ्वण्यासाठी मदत करतात. तसेच या लेपमुळे त्वचेवरील डेडस्किन, ओपन पोअर्स, टॅनिंग निघून जाण्यास मदत होईल. हा लेप तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा लावू शकता. यामुळे तुमची त्वचा सुंदर आणि उजळदार होण्यास मदत होईल. तसेच हा उपाय नियमित केल्यास चेहऱ्यावरील डार्क स्पॉट्स, व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स निघून जाऊन त्वचा स्वच्छ आणि उजळदार होण्यास मदत होईल.