फोटो सौजन्य - Social Media
दिल्ली-एनसीआरमधील हवा गेल्या काही दिवसांपासून सतत ‘घातक’ श्रेणीत आहे. एअर क्वालिटी इंडेक्स धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यामुळे बाहेर पडताच श्वास घेण्यास त्रास, खोकला, छातीत जळजळ आणि डोळ्यांत चुरचुरणे अशा समस्या वाढू लागल्या आहेत. शहर सोडणं शक्य नसल्याने वाढत्या प्रदूषणाशी लढण्यासाठी आपल्यालाच आपलं संरक्षण भक्कम बनवावं लागतं. यासाठी फुफ्फुस मजबूत ठेवणाऱ्या सवयी अंगीकारणे आजच्या काळात सर्वात महत्त्वाचं ठरत आहे.
अनेकांना फुफ्फुसांचं आरोग्य म्हणजे धूम्रपान टाळणं किंवा धूळ–धुरापासून दूर राहणं एवढंच वाटतं. पण तज्ज्ञ सांगतात, फुफ्फुसांची खरी काळजी आपल्या दैनंदिन दिनचर्येशी आणि आपण श्वास कसा घेतो, किती सक्रिय आहोत, पचनसंस्था किती संतुलित आहे याच्याशी जोडलेली आहे. एनेस्थेसिया आणि पेन मेडिसिन तज्ज्ञ डॉ. कुणाल सूद यांच्या मते काही साध्या सवयी शरीरात प्रदूषणाचा परिणाम कमी करतात आणि फुफ्फुस अधिक ताकदीने कार्य करू लागतात
चला जाणून घेऊया त्या महत्त्वाच्या सवयी:
रोज 20–30 मिनिटे कार्डिओ व्यायाम करा
फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी नियमित कार्डिओ एक्सरसाइज हा सर्वात प्रभावी आणि सोपा मार्ग आहे. रोजचा वेगवान चालण्याचा व्यायाम, हलकी जॉगिंग, सायकलिंग किंवा स्टेअर वॉकिंग साध्या पण उपयुक्त सवयी आहेत. यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते, डायाफ्राम अधिक प्रभावीपणे काम करतो आणि श्वसनमार्गातील धूळ, कफ आणि प्रदूषक पदार्थ नैसर्गिकरित्या बाहेर पडण्यास मदत होते. दीर्घकाळ या सवयीमुळे फुफ्फुस मजबूत आणि कार्यक्षम राहतात.
योग्य पद्धतीने श्वास घेण्याचा सराव
आपण श्वास अनायासे घेतो, पण योग्य तंत्राने श्वास घेतल्यास फुफ्फुसांवरचा सकारात्मक परिणाम अनेक पटीनं वाढतो. नाकातून खोल श्वास घेणं, हळूवार श्वास सोडणं किंवा ‘बॉक्स ब्रीदिंग’ सारखे श्वसन-अभ्यास फुफ्फुसांची क्षमता वाढवतात. हे सराव शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण संतुलित ठेवतात आणि तणावामध्येही शरीराचा ‘CO2 टॉलरन्स’ सुधारतात, ज्यामुळे श्वास लागण्याची प्रवृत्ती कमी होते.
पचनसंस्थेची काळजी घ्या
तज्ज्ञांच्या मते ‘गट-लंग कनेक्शन’ म्हणजेच आंत आणि फुफ्फुस यांचा संबंध अत्यंत महत्त्वाचा आहे. संतुलित आहारामुळे आंतातील सूक्ष्मजीवांची रचना निरोगी राहते आणि शरीरातील सूज कमी होते. सूज कमी झाल्यास वायुमार्ग अधिक लवचिक आणि निरोगी राहतात. यासाठी फायबरयुक्त आहार, दही, किण्वित पदार्थ आणि गरजेनुसार प्रोबायोटिक सप्लीमेंट उपयुक्त ठरतात. आंताचं आरोग्य सुधारलं की श्वसनक्षमताही नैसर्गिकरित्या मजबूत होते.
ही माहिती सामान्य जागरूकतेसाठी आहे. कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी किंवा आहारात मोठे बदल करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.






