Plum Cake Recipe : ख्रिसमस आणि प्लम केकच नातं जरा आगळचं... भरपूर ड्रायफ्रूट्स, संत्र्याचा ज्यूस आणि मैदा घालून बनवलेला हा केक चवीला फार अप्रतिम लागतो. तुम्ही घरीदेखील बेकरीसारखा टेस्टी प्लम केक तयार करू शकता.
दरवर्षीप्रमाणे यंदाही २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस हा सण साजरा केला जाणार आहे
या सणानिमित्त प्लम केक बनवण्याची आणि खाण्याची जुनी पद्धत आहे
बाजरात कशाला तुम्ही घरीही सोप्या पद्धतीमध्ये हा केक तयार करू शकता
ख्रिसमस स्पेशल प्लम केक ही प्रत्येक घरात साजरी होणाऱ्या ख्रिसमसच्या आनंदाची एक खास गोड परंपरा आहे. हिवाळ्यातील थंड हवेमध्ये घरभर पसरणारा मसाल्यांचा सुवास, ड्रायफ्रूट्सचा समृद्ध स्वाद आणि केकची मऊ, ओलसर टेक्स्चर हे सर्व मिळून हा केक खरोखरच उत्सवाला खास स्पर्श देतो. परंपरेनुसार प्लम केक काही दिवस आधीच बनवला जातो, ज्यात ड्रायफ्रूट्सला रम किंवा ज्यूसमध्ये भिजवून ठेवले जाते, ज्यामुळे त्याचा सुगंध आणि स्वाद अधिक गहिरा होतो. आजकाल अनेक जण अल्कोहोल न वापरता हा केक बनवतात आणि तो तितकाच स्वादिष्ट तयार होतो. ख्रिसमस ट्रीची सजावट, घरातील दिव्यांची रोषणाई आणि ओव्हनमध्ये बेक होणाऱ्या प्लम केकचा सुगंध… हीच ख्रिसमसची खरी जादू! चला तर मग, ही पारंपरिक पण सोपी ख्रिसमस स्पेशल प्लम केक रेसिपी जाणून घेऊया.
यासाठी सर्वप्रथम सर्व ड्रायफ्रूट्स एका बाउलमध्ये घ्या. त्यावर संत्र्याचा ज्यूस आणि लिंबाचा रस टाकून रात्रीभर भिजू द्या. याने केकचा स्वाद जबरदस्त वाढतो.
कढईत साखर टाका आणि हलक्या आचेवर वितळू द्या. ते गडद तपकिरी झाल्यावर त्यात 2-3 टेबलस्पून पाणी टाका. छान सिरप बनवा आणि थंड होऊ द्या.
एका बाउलमध्ये मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दालचिनी पावडर , लवंग पावडर आणि जायफळ पावडर चाळून घ्या.
बटर मऊ करून त्यात तयार केलेला कॅरामेल सिरप आणि अंडी घालून छान फेटून घ्या. त्यात व्हॅनिला इसेन्स घाला.
ओलसर मिश्रणात हळूहळू मैद्याचे मिश्रण मिसळा. नंतर भिजवलेले ड्रायफ्रूट्स (ज्यूससह) आणि चिरलेले बदाम/काजू घालून एकसारखे मिसळा.
केक टिनला बटर लावून मैदा भुरा लावा. मिश्रण त्यात ओता आणि 160°C वर 45–55 मिनिटे बेक करा. मध्ये
टूथपिक घालून तपासा, ती स्वच्छ बाहेर आली तर केक तयार.
केक पूर्ण थंड होऊ द्या. तो जितका वेळ तो ठेवला जाईल तितका अधिक चविष्ट होतो.
ख्रिसमस पार्टीमध्ये तुम्ही या केकला गरमा गरम चहा किंवा कॉफीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता
Web Title: Christmas 2025 know how to make plum cake at home recipe in marathi