Pope Trump Debate : 'जगाची शांतता महत्त्वाची', ट्रम्प आणि पोप लिओ यांच्यात पुन्हा वाद पेटला, जाणून घ्या काय घडलं? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
शनिवारी (१८ एप्रिल) कॅमेरुनहून अंगोलाला जात असताना पोप लिओ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी ट्रम्प यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, मला अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसोबत वाद घालण्यात कोणताही रस नाही. माझे उद्दिष्ट जगात शांतता आणि बंधुत्वाचा संदेश देणे आहे. ट्रम्प यांच्या विधानामुळे मी शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टापासून मागे हटणार नाही असे पोप लिओ यांनी स्पष्ट केले.
पोप लिओ यांनी ट्रम्प यांच्या इमिग्रेशन आणि परराष्ट्र धोरणावर टीका केली होती. त्यांनी अमेरिकेच्या इराणवरील लष्करी कारवाईचा निषेध केला होता. ट्रम्प यांनी इराणची संस्कृती नष्ट करण्याची धमकी दिली होती, ज्याला पोप लिओ यांनी अस्वीकार्य म्हटले. युद्ध संपण्यासाठी कोणत्याही धार्मिक कारणाचा वापर करणे निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी इमिग्रेशन धोरणांमुळे स्थलांतरितांना होणाऱ्या त्रासावर चिंता व्यक्त केली होती. त्यांनी जगाला शांततापूर्ण संवादातूनच शांतता प्रस्थापित होऊ शकते असा स्पष्ट संदेश दिला.
मात्र ट्रम्प यांना हे रुचले नाही आणि त्यांनी १२ एप्रिल रोजी आपल्या ट्रुथ सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट केली. त्यांनी म्हटले की, पोप हे गुन्हेगारीबाबत अत्यंत मवाळ आहेत. त्यांनी डाव्या विचारसरणीच्या नेत्याशी हातमिळवणी केली असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. ते अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांसाठी घातक असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले. ट्रम्प यांनी पोप लिओंना राजकारणाकडे लक्ष न देता धर्माकडे लक्ष देण्याचा आणि चांगले पोप बनण्याचा प्रयत्न कराण्याचा सल्ला दिला.
परंतु पोप लिओ यांनी ट्रम्प यांच्या टीकेवर संताप व्यक्त न करता संयमाने त्यांना उत्तर दिले. त्यांनी जगाला माणुसकी आणि शांततेचा मार्ग अधिक श्रेष्ठ असल्याचे स्पष्ट केले.
Trump यांनी स्वतःला ‘येशू ख्रिस्ताचा अवतार’ केलं घोषित; पोप लिओबद्दलही वादग्रस्त व्यक्त, जगात खळबळ
Ans: ट्रम्प यांनी त्यांच्यावर केलेल्या टिकेला पोप लिओ यांनी अत्यंत संयमाने चोख प्रत्युत्तर देत म्हटले की, राष्ट्राध्यक्षांशी वाद घालण्यात मला रस नाही, माझे उद्दिष्ट जगात शांतता आणि बंधुत्वाचा संदेश देणे आहे. त्यापासून मी मागे हटणार नाही.
Ans: पोप लिओ यांनी अमेरिकेच्या इराणविरोधी कारवाईला विरोध केला होता. यावेळ ट्रम्प यांनी पोप लिओ यांनी राजकारणात लक्ष न देता धर्माकडे पाहावे. त्यांचे विचार डाव्या विचारसरणीचे असूव गुन्हेगारीबाबत अत्यंत मवाळ आहेत.






