सोप्या पद्धतीमध्ये बनवा आलू मटार टिक्की
सकाळच्या वेळी मुलांना नाश्त्यामध्ये आणि डब्यात खायला काय द्यावं? हा प्रश्न सर्वच पालकांना नेहमी पडतो. अशावेळी तुम्ही मुलांना नाश्त्यामध्ये पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खाण्यास देऊ शकता. नाश्त्यामध्ये पौष्टिक पदार्थ खायला दिल्यामुळे मुलांच्या शरीराचा विकास होतो. शिवाय साथीच्या आजरांपासून शरीर निरोगी राहते. काहींना सतत बाहेरचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाण्याची सवय असते. पण सतत तेलकट आणि बाहेरच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे लहान मुलांचे आरोग्य बिघडू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या नाश्त्यासाठी आणि डब्यासाठी आलू मटार टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी कमीत कमी वेळात झटपट तयार होते. घाईगडबडीमध्ये सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे पोट भरलेले राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. नाश्ता करणं ही आरोग्यदायी सवय असून नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. पण अनेक लोक सकाळच्या वेळी नाश्ता करणं टाळतात. असे केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया आलू मटार बनवण्याची सोपी रेसिपी.
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा