हिवाळ्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी आणि टेस्टी गाजर टोमॅटोचे सूप
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. अशावेळी सूप बनवून प्यायले जाते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सूप प्यायला खूप आवडते. सूप प्यायल्यामुळे शरीराला पोषण मिळते. या दिवसांमध्ये बाजारात अनेक फळे भाज्या उपलब्ध असतात. त्यात टोमॅटो गाजर इत्यादी भाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. गाजरपासून सूप बनवले जाते. पण आज आम्ही तुम्हाला दोन्ही भाज्या एकत्र करून टोमॅटो गाजरचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या दोन्ही भाज्यांमध्ये विटामिन ए आणि सी मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्याचा आरोग्यासह त्वचेलासुद्धा फायदा होतो. शिवाय यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक आढळून येते आणि कमी कॅलरीज असतात. टोमॅटो गाजरचे सूप प्यायल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. सूप हा पदार्थ तुम्ही सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी छोटी मोठी भूक लागल्यानंतर पिऊ शकता. चला तर जाणून घेऊया गाजर टोमॅटोचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा