खुसखुशीत नारळाच्या वड्या
नारळी पौर्णिमेच्या आधल्या दिवशी सर्वच घरांमध्ये काहींना काही गोडाचे पदार्थ बनवले जातात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं नारळी वड्या खूप आवडतात. महाराष्ट्रातील कोळी बांधव नारळी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतात. समुद्राला सोन्याचा नारळ वाहू पुन्हा एकदा मासेमारी करण्यास सुरुवात केली जाते. राखीपौर्णिमा या सणालाच नारळी पौर्णिमा असे सुद्धा बोलले जाते. यादिवशी सर्वच घरांमध्ये नारळी भात आणि नारळ वड्या, नारळाच्या करंज्या, नारळाचा लाडू इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. त्यामुळे यंदाच्या नारळीपोर्णिमेला तुम्हीसुद्धा घरीच या सोप्या टिप्स वापरून नारळी वड्या बनवा. तुम्ही बनवलेल्या वड्या घरातील सगळ्यांना नक्की आवडतील. चला तर जाणून घेऊया नारळी वड्या बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)






