दूध- शेवयांचा वापर करून बनवा थंडगार कस्टर्ड फालुदा
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या गर्मीमुळे अंगाची काहिली होते. कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर सतत येणाऱ्या घामामुळे खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढू लागतो. कायमच लस्सी, ताक, आईस्क्रीम खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी घरात तुम्ही नवनवीन पदार्थ बनवून खाऊ शकता. कडाक्याच्या गर्मीमध्ये शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी दूध शेवयांचा वापर करून थंडगार कस्टर्ड फालुदा नक्की बनवून पहा. हा पदार्थ चवीला अतिशय भारी लागतो आणि शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. गर्मी वाढल्यामुळे पोटात जळजळ होणे, उन्हाळी लागणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सर्वच त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.घरातील प्रत्येकाला फालुदा खायला खूप जास्त आवडतो.याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुद्धा फालुदा नक्कीच बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)






