लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक नाश्ता! १० मिनिटांमध्ये वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा चॉकलेट पॅनकेक, सगळेच खातील आवडीने
सकाळच्या नाश्त्यात मुलांना कायमच चमचमीत आणि टेस्ट पदार्थ खाण्यास हवे असतात. कायमच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची खूप जास्त इच्छा होते. सर्वच लहान मुलांना चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. चॉकलेटचे नाव ऐकल्यानंतर लहान मुलं लगेच खाण्याचा हट्ट करतात. आज आम्ही तुम्हाला वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून चॉकलेट पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले चॉकलेट पॅनकेक चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर ठरतील. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. नाचणीच्या सेवनामुळे शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते. सकाळच्या वेळी पौष्टिक आणि पोटभर नाश्ता केल्यास लवकर भूक लागणार नाही आणि संपूर्ण दिवस आनंद, उत्साहात जाईल. नाचणीचे सेवन केवळ लहान मुलाचं नाहीतर मोठेसुद्धा करू शकतात. नियमित नाचणीपासून बनवलेली एक भाकरी खाल्ल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया नाचणी पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






