गौराईच्या नैवेद्यासाठी दुधापासून झटपट बनवा चविष्ट दूधपुआ
राज्यासह संपूर्ण देशभरात सणावाराच्या दिवसांमध्ये अनेक वेगवेगळे पारंपारिक पदार्थ बनवले जातात. गणपती बाप्पाचे सगळीकडे मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. गणपती आल्यानंतर तीन दिवसांनी घरात गौराईचे आगमन होते. गौरी पूजन करून वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. कोकणात जेष्ठ गौरीचे आगमन झाल्यानंतर अनेक वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. त्यात अतिशय आवडीने बनवला जाणारा पदार्थ दुधपुआ.याआधी तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवलेला मालपुआ खाल्ला असेल पण आज आम्ही तुम्हाला दुधपुआ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पदार्थासाठी जास्त साहित्य आणि वेळ सुद्धा लागत नाही. कमीत कमी वेळात झटपट पदार्थ तयार होतो. चला तर जाणून घेऊया दुधपुआ बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
गणपती बाप्पाच्या नैवेद्यात मोदकांसोबत झटपट बनवा साजूक तुपातील अक्रोडचा हलवा, नोट करा रेसिपी