सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीटरूट इडली
सकाळच्या नाश्त्यात हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. कारण सकाळच्या वेळी नाश्ता केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि दुपारी लवकर भूक लागत नाही. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहाने भरलेले जातो. त्यामुळे सकाळच्या वेळी पोटभर आणि पौष्टिक नाश्त्याचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बीटरूट इडली बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. चवीला तुरट असलेले बीट लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा खायला आवडत नाही. पण बीट खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. बीटमध्ये लोह, कॅल्शियम, विटामिन सी इत्यादी अनेक घटक आढळून येतात. शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात बीटचे सेवन करावे. याशिवाय इडली खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेउया बीटरूट इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
आंबट गोड चवीच्या स्ट्रॉबेरीपासून बनवा चटकदार स्ट्रॉबेरी चटणी, जेवणात जातील चार घास जास्त
भाजी बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट पापडची चटणी, ८ दिवस राहील टिकून