प्रिझर्व्हेटिव्ह आणि साखरेचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट संत्र्याचा जाम! ब्रेडसोबत लागेल मस्त
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारची फळे उपलब्ध असतात. त्यातील आंबटगोड चवीची संत्री सगळ्यांचं खायला आवडते. संत्रींमध्ये विटामिन सी आणि इतर पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. रसाळ, गोडसर आणि आंबट चव असलेली फळे शरीरासाठी अतिशय गुणकारी आहेत. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात फळांचे सेवन केल्यास दीर्घकाळ पोट भरलेले राहील. सकाळच्या घाईमध्ये लहान मुलांना कायमच ब्रेड आणि जाम खाण्यास दिला जातो. पण नेहमीच विकत आणलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये संत्र्याचा जाम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. जाम हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांना खूप जास्त आवडतो. संत्र्याचा जाम बनवताना त्यात साखर किंवा इतर कोणत्याही प्रिझर्व्हेटिव्हचा वापर करू नये. बऱ्याचदा जाम बनवताना कायमच तासनतास गॅस जवळ उभे राहावे लागते.पण या पद्धतीमध्ये बनवलेला जाम आठवडाभर व्यवस्थित टिकून राहतो. चला तर जाणून घेऊया संत्र्याचा जाम बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – istock)
Recipe : हेल्दी खायचंय तर घरी बनवा ‘अंकुरलेल्या मुगाची चाट’, चवही लागेल भारी






