सकाळच्या नाष्ट्यात बनवा हेल्दी आणि चविष्ट चाट
सकाळच्या नाश्त्यात मोड आलेले कडधान्य खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन आढळून येते, जे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मोड आलेले मूग पचनास अतिशय हलके असतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात सुद्धा तुम्ही मोड आलेल्या मुगाचे सेवन करू शकता. यामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि अनेक खनिजे आढळून येतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी आहारात मुगाचे सेवन करावे. मूग खाल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते आणि शरीराला आवश्यक असलेली घटक मिळतात. सकाळच्या वेळी पौष्टिक आणि पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. शिवाय वाढलेली वजन कमी करण्यासाठी तुम्ही सकाळच्या नाश्त्यात मोड आलेल्या कडधान्यांचे सेवन करू शकता. आज आम्ही तुम्हाला मोड आलेल्या मुगांपासून चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे चाट झटपट तयार होते.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा