आजकाल कामाच्या धावपळीमुळे अनेकजण आपल्या आरोग्याची आणि त्वचेची तसेच केसांची काळजी योग्य प्रकारे घेत नाहीत आणि यामुळे त्यांना अनेक समस्यांना समोरे जावे लागते. यातीलच एक समस्या म्हणजे केस पांढरे होणे. पूर्वी केस काळे होणे म्हणजे वृद्धत्वाचे लक्षण मानले जायचे मात्र आता तर तरुणांनाही मोठ्या प्रमाणात ही समस्या उद्भवत आहे.
अनेकदा लोक केस काळे करण्यासाठी रासायनिक कलर्सचा वापर करतात मात्र हे कलर केसांसाठी हानिकारक ठरू शकतात. याशिवाय तुम्ही घरातच नैसर्गिक पद्धतीने आपले केस पांढरे केस काळे करू शकता यासाठी तुम्ही मेहंदीचा आधार घेऊ शकता. केस काळे करण्यासाठी मेहंदीचा उपाय सर्वात उत्तम. आता अनेकांना मेहंदी कशी भिजवावी याची योग्य पद्धत माहिती नसते, म्हणूनच आज आम्ही तुम्हाला याची सविस्तर माहिती सांगणार आहोत. यासंबंधित एक व्हिडियो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
मेहंदीचा हा व्हिडियो @prajakta_salve_marathi या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये, केस काळेभोर होण्यासाठी मेहंदी अशी भिजवावी असे लिहिण्यात आले आहे. या अकाउंटवर भन्नाट जगात आणि ट्रिक्स शेअर केल्या जातात आणि अनेक लोक हे जुगाड फॉलोदेखील करत असतात. त्यांच्या अशा व्हिडीयोंना युजर्सची चांगला प्रतिसाद मिळत असतो. त्यामुळेच तुम्हालाही पांढऱ्या केसांची समस्या असल्यास हा घरगुती जुगाड नक्की करून पहा.






