महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी
राज्यासह संपूर्ण देशभरात महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. कारण कोणत्याच ठिकाणी महिला सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे. महिलांना हल्ली घराच्या बाहेर पडणे देखील भीतीचे वाटू लागले आहे. संपूर्ण देशभरात महिलांसंबंधित गुहण्यांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने महिलांना किती सुरक्षित आहेत? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. सकाळ, दुपार किंवा संध्याकाळच्या वेळी महिलांना बाहेर पडणे कठीण झाले आहे. देशभरात कोणत्याही ठिकाणी महिलांवर होत असलेल्या अत्याचारामुळे त्यांच्या रोजगारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे महिलांनी बाहेर गेल्यानंतर स्वतःच्या आरोग्याची स्वतःच काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – iStock)
पुणे पोलिसांनी वार्षिक गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. यावर बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, “महिलांशी संबंधित गुन्ह्यांची त्वरित आणि मुक्त नोंदणी झाल्यामुळे” बलात्कार आणि विनयभंगाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. २०२४ मध्ये बलात्काराचे ५०५ आणि विनयभंगाचे ८६४ गुन्हे दाखल झाले, तर २०२३ मध्ये बलात्काराचे ४१० आणि विनयभंगाचे ७७५ गुन्हे दाखल झाले. अशा परिस्थित महिलांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्या पुढील प्रमाणे आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तारे जाणून घेऊया.
महिलांनी बाहेर जाताना नेहमी स्वतःचा फोन घेऊनच बाहेर जावे. यामुळे कोणत्याही क्षणी संशयास्पद घटना घडली असे वाटल्यास भावाला, बहिणीला, वडिलांना, पतीला किंवा मित्राला फोन करून तुम्ही सांगू शकता. यामुळे घरी पोहोचताना गाडी किंवा कॅबचा नंबर सांगिलत्यामुळे तुमच्ये लोकेशन ट्रॅक करता येईल. यामुळे तुमच्या जीवाला कोणतीही हानी पोहचणार नाही.
बाहेर गेल्यानंतर शांत मोकळ्या जजागेवरून चालणे टाळावे. याशिवाय वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने चालल्यामुळे समोर कोण येत आहे की नाही स्पष्ट दिसून येते. रस्त्यावरून चालताना नेहमी माणसांच्या गर्दीमधून चालावे. यामुळे मागून हल्ला होण्याची भजिरी कमी होऊन जाईल. शांत जागी रहदारी नसल्यामुळे काहींना सतत भीती वाटू लागते.
चालताना नेहमी आजूबाजूला पाहूनच चालावे. ज्यामुळे मागून येऊन कोणी हल्ला करेल याची भीती कमी होऊन जाते. याशिवाय प्रवास करताना जवळच्या व्यक्तीला ऑटो किंवा कॅब नंबर मेसेज करून ठेवावं.यामुळे कॅब किंवा रिक्षाचे लोकेशन ट्रक करणे सोपे होऊन जाते. गुगल मॅप्सवर जवळच्या पोलिस स्टेशन आणि पीसीआरचे स्थान बघत राहावे.
बाहेर गेल्यानंतर स्वतःच्या आरोग्याची स्वतःच काळजी घ्यावी. प्रत्येक वेळी घरातील कोणत्याही वयातील सोबत घेऊन जावे. यामुळे सोबतही राहते आणि गुन्हेगारीच्या घटना कमी घडतात.