छातीमध्ये साचून राहिलेले पित्त कायमचे होईल गायब! स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचे करा सेवन
दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. ज्यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल, ॲसिडिटी इत्यादी आजार वाढण्याची शक्यता असते. आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, कामाचा तणाव, एक जागेवर बसून ८ तासांपेक्षा जास्त वेळ काम करणे, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. याशिवाय कामाच्या ठिकाणी ८ ते १० तास एकाचं जागेवर बसून काम करत राहिल्यामुळे शरीरात अनेक बदल होऊ लागतात. यामुळे प्रामुख्याने ॲसिडिटीची समस्या उद्भवू लागते. पित्त, जळजळ, अपचन, गॅस झाल्यामुळे पोटासंबंधित गंभीर समस्या उद्भवतात. पित्ताच्या सतत होणाऱ्या त्रासामुळे पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते.(फोटो सौजन्य – iStock)
एक मूठ चण्यात आहे मजबूत ताकद, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त; 7 कमालीचे फायदे
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर शरीराची पचनक्रिया बिघडते, ज्यामुळे अपचन किंवा ॲसिडिटीची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. ॲसिडिटी झाल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घेतात, मात्र सतत गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी घरगुती उपाय करून ॲसिडिटीवर आराम मिळवावा. आज आम्ही तुम्हाला ॲसिडिटी झाल्यानंतर स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी कोमट पाण्यात तूप टाकून प्यावे. तूप शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. तुपाचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. ॲसिडिटी झाल्यानंतर किंवा सकाळी उपाशी पोटी तुपाच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीराची पचनक्रिया निरोगी राहील. याशिवाय शरीरातील उष्णता नियंत्रणात करण्यासाठी तुपाच्या पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायद्याचे आहे.
कोथिंबिरीच्या रसाच्या सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. तसेच ॲसिडिटी झाल्यानंतर कोथिंबिरीच्या रसाचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोथिंबीरच्या पाण्याचे सेवन केल्यास ॲसिडिटी नियंत्रणात राहील आणि शरीर सुधारण्यास मदत होईल. याशिवाय या रसाचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि ॲसिडिटी कमी होते.
ॲसिडिटी झाल्यानंतर गोळ्या औषध खाण्यापेक्षा गूळ आणि बडीशेप खावी. यामुळे छातीमधील ॲसिडिटी कमी होऊन जळजळ थांबेल. ॲसिडिटी झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. याशिवाय डोके दुखणे, छातीमध्ये वेदना होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे ॲसिडिटी झाल्यानंतर दुर्लक्ष न करता हे घरगुती उपाय करून आराम मिळवावा.