उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक महिला चेहरा थंड राहण्यासाठी आईस फेशिअल (Ice facial) करतात. सध्या सगळीकडे आईस फेशिअल हे मोठ्या प्रमाणावर ट्रेंडिंगला आहे. यामुळे त्वचा चमकदार आणि सुंदर दिसते. ही एक ब्यूटी ट्रीटमेंट कोरियामधून (Korea) आली आहे. यामुळे त्वचा दीर्घकाळ तरुण ठेवण्यासाठी याचा फायदा केला जातो. मात्र बऱ्याच महिला हे फेशिअल करताना चुका करतात. यामुळे त्वचेचा फायदा होण्याऐवजी त्वचेचे नुकसान होते. उन्हाळ्यात आइस फेशियल करताना त्वचेची काळजी घेतली नाही तर गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते.आइस फेशियलमुळे कोणत्या समस्या जाणवतात चला तर जाणून घेऊया.
चेहऱ्यावर पुरळ येणे
ज्यांची त्वचा संवेदनशील आहे अशा व्यक्तींसाठी आइस फेशियल चांगले नाही, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे तुमच्या त्वचेला जळजळ जाणवू शकते आणि तुमच्या चेहऱ्याचा रंगही निस्तेज निर्माण होऊ शकते. यामुळे संवेदनशील त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी आइस फेशियल करू नये. ज्यांची त्वचा कोरडी आहे अशा व्यक्तीनी रोज बर्फाचे फेशियल केले तर त्यांच्या चेहऱ्यावर गुलाबी रॅशेस येण्याची शक्यता असते.
रक्ताभिसरण
आईस फेशिअल केल्यानंतर त्वचेतील रक्ताभिसरण थांबते. जर तुम्हाला तुमच्या त्वचेसंबंधित अशा काही समस्या जाणवत असतील तर तुम्ही आइस फेशियल करू नका. तसेच यामुळे त्वचा रफ होऊ शकते आणि त्यामुळे त्वचेवर ओरखडे येण्याची शक्यता असते. जर तुम्हाला आईस फेशिअल करायचा असेल तर तुम्ही हलक्या हाताने चेहरा मसाज करू शकता.
त्वचा जळजळ होणे
आईस फेशियल करत असताना बर्फ थेट चेहऱ्यावर लावला तर त्वचेचे नुकसान होऊ शकते. यामुळे त्वचा जळजळू शकते. आइस फेशियल करताना एका सुती कपड्यामध्ये बर्फ ठेवून नंतर बर्फ चेहऱ्यावर फिरवावा. त्यामुळे उपचार घेल्यानंतर चेहरा आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
इन्फेक्शन
पाण्याने चेहरा न धुवत आईस फेशिअल करण्यास सुरुवात केल्याने चेहऱ्यावर इन्फेक्शन होऊ शकते. त्वचेला बॅक्टेरियाच्या संसर्गाचा सामना करावा लागू शकतो. अस्वच्छ चेहऱ्यावर बर्फ लावल्याने त्वचेच्या छिद्रांमध्ये बॅक्टेरिया अडकून पडतात. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची शक्यता असते.