डोळ्यांमध्ये वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी 'या' जीवनसत्त्वांचा आहारात करा समावेश
कोरोनानंतरच्या काळात सगळीकडे डिजिटल माध्यमाचा वापर केला जात आहे. कोरोना काळात थांबलेली जीवनशैली पुन्हा एकदा नव्याने सुरु झाली. त्यामुळे सगळीच कामे ऑनलाईन होऊन लागल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य खराब होऊ लागले आहे. सतत मोबाईल फोन, लॅपटॉप, टीव्ही इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासोबतच डोळ्यांवर लगेच दिसून येतो. डोळ्यांचे आरोग्य खराब झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. सतत मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम करत राहिल्यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा वाढणे, डोळे लाल होणे, डोळ्यांमधून सतत पाणी येणे, डोळे कायम लाल दिसणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र काही दिवसांनंतर पुन्हा एकदा डोळ्यांसंबंधित समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
डोळ्यांसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. यासोबतच डोळे कायम निरोगो राहण्यासाठी आहारात बदल करून डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणत्या जीवनसत्त्वांचे आहारात सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचे असे हे जीवनसत्त्व आहे. सूर्यफुलाच्या बियांमधून डोळ्यांना विटामिन ए मिळते. याशिवाय आहारात विटामिन ए युक्त पदार्थांचे नियमित सेवन करावे.
डोळ्यांसह एकूण शरीराच्या आरोग्यासाठी क जीवनसत्त्व महत्त्वाचे आहे. हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे ज्यामुळे डोळ्यांचे नुकसान होत नाही. यासाठी आवळा, संत्री, पपई, द्राक्षे, कलिंगड या फळांचा समावेश तुम्ही आहारात करू शकता. ओलावा कायम राहतो. पालक, गाजर, हिरव्या पालेभाज्या, शिमला मिरची याचा जेवणात समावेश करून तुम्ही अ जीवनसत्त्व मिळवू शकता.
अँटीऑक्सिडेंटस् व फ्री रॅडिकल्सच्या संतुलनासाठी ई जीवनसत्त्व महत्त्वाचे ठरते. यासाठी तुम्ही आहारात हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा, सोयाबीन तेलाचा समावेश करू शकता. याशिवाय संपूर्ण शरीराला अनेक फायदे होतील. आहारात विटामिन ई युक्त पदार्थांचे सेवन केल्यास डोळ्यांमधील कोरडेपणा कमी होईल आणि त्वचेसुद्धा अनेक फायदे होतील.