वाढलेले वजन कमी करताना आहारात करा 'या' पिवळ्या फळाचे सेवन
जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात.शरीरात वाढलेला लठ्ठपणा आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक आजार होण्याची शक्यता असते. चुकीचा आहार, धावपळीची जीवनशैली, कामाचा तणाव, अपुरी झोप, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे वाढलेले वजन कमी करताना सकाळच्या नाश्त्यात केळी खावी. केळी खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेल्या पोटॅशियममुळे शरीराची पचनक्रिया सुधारते.(फोटो सौजन्य – iStock)
अणुबॉम्बचे शरीरावर होतात गंभीर परिणाम, तात्काळ आणि दीर्घकालीन दोन्हीचा खोलवर त्रास
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी केळ्याचे सेवन केल्यास बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. तसेच शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. सकाळच्या नाश्त्यात केळ्यांचा शेक प्यायल्यास शरीराची ऊर्जा कायम तशीच राहील आणि आरोग्यासंबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करताना केळ्याचे सेवन केल्यास आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
केळ्यांचे सेवन केल्यामुळे लवकर भूक लागत नाही. शरीराची भूक नियंत्रणात असतो. यामध्ये भरपूर प्रमाणात फॅट्स आढळून येतात. त्यामुळे केळी खाल्यानंतर पोट लगेच भरल्यासारखे वाटते. केळ्यांमध्ये पोटॅशियम, विटामिन बी६ आणि मॅंगनीज इत्यादी अनेक घटक आढळून येतात. ज्यामुळे शरीरात शरीरातील इलेक्ट्रोलाइटची पातळी वाढवते, हाडे मजबूत राहण्यास मदत होते. सकाळच्या नाश्त्यात नियमित केळ्याचे शेक बनवून प्यावे.
वाढलेले वजन कमी करताना रोजच्या आहारात इतर कोणत्याही शेकचे सेवन करण्याऐवजी आहारात केळ्यांच्या शेकचे सेवन करावे. केळ्यांपासून बनवलेला शेक वजन कमी करण्यास मदत करतो. यामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे भूक लागल्यानंतर कोणतेही चटकदार किंवा तिखट पदार्थ खाण्याची इच्छा पूर्णपणे कमी होऊन जाते. स्नायूंमधील ताकद वाढवण्यासाठी नियमित केळी खावी.
शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधरण्यासाठी केळ्याचे सेवन करावे. केळी खाल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. केळ्यांचे सेवन केल्यामुळे हँगओव्हर, सुस्ती, चक्कर येणे, थकवा इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळतो. केळी खाल्यामुळे आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टरीयाची वाढ होते. याशिवाय शरीरात इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता निर्माण होत नाही.