चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांवर आलेले पिंपल्स शरीरातील कोणत्या समस्या दर्शवतात:
सर्वच महिला मुलींना चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी सतत काहींना काही उपाय करत असतात. मात्र तरीसुद्धा त्वचा सुंदर आणि डागविरहित होत नाही. डागविरहित त्वचा मिळवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा वापर केला जातो. मात्र तरीसुद्धा त्वचेवर कोणताच परिणाम दिसून येत नाही. हल्ली सोशल मीडियावर त्वचेसंबंधित अनेक स्किन केअर रुटीन, मेकअप प्रॉडक्ट, स्किन केअर प्रॉडक्ट इत्यादी अनेक गोष्टी दाखवला जातात. या प्रॉडक्टचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे त्वचेवर पिंपल्स, पुरळ किंवा मुरूम येण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेवर सूट होणाऱ्या प्रॉडक्टचा घरगुती पदार्थांचा वापर करावा.(फोटो सौजन्य – iStock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासह त्वचेसाठी सुद्धा अतिशय हानिकारक असतात. यामुळे त्वचेवर पिंपल्स, पुरळ, मुरूम येऊ लागतात. त्यामुळे शरीर स्वच्छ असणे आवश्यक आहे. महिलांसह पुरुषांच्या सुद्धा त्वचेवर पिंपल्स आणि डाग येतात. कपाळ, हनुवटी, भुवया इत्यादी भागांवर आलेले पिंपल्स लवकर जात नाहीत. चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांवर आलेल्या समस्या शरीरात निर्माण झालेल्या वेगवेगळ्या समस्या दर्शवतात. त्यामुळे या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी.
चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांवर आलेले पुरळ किंवा पिंपल्स हे चेहऱ्याच्या समस्या नसून शरीरातील अवयवांमध्ये बिघाड झाल्याची लक्षण आहेत. त्यामुळे अशी समस्या उद्भवू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी. पिंपल्स किंवा मुरुम येऊन त्वचा खराब झाल्यानंतर अनेकदा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. शरीरात होणारे हार्मोनल बदल, वाढलेले वय इत्यादी अनेक कारणांमुळे त्वचेवर पिंपल्स येऊ लागतात. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांवर आलेले पिंपल्स शरीरातील कोणत्या समस्या दर्शवतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांवर आलेले पिंपल्स शरीरातील कोणत्या समस्या दर्शवतात:
चेहऱ्यावर आलेले व्हाईटहेड्स सारखे छोटे छोटे पुरळ केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर येतात. केसांमध्ये कोंडा वाढल्यानंतर त्वचेवर पुरळ येण्यास सुरुवात होते. त्यामुळे केसांत कोंडा झाल्यानंतर घरगुती उपाय करून कमी करण्याचा प्रयत्न करावा.
गालांवर आलेले पुरळ आतड्यांसंबंधित समस्या असल्याचे दर्शवतात.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
हनुवटीवर आलेले छोटे छोटे पुरळ किंवा पिंपल्स शरीरात निर्माण झालेले हार्मोनचे असंतुलन दर्शवतात. त्यामुळे या समस्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.
नाकावर आलेले पुरळ शरीरात व्यवस्थित रक्त पुरवठा होत नसल्याचे आणि पचनसंस्था बिघडल्याचे दर्शवतात.