दरवर्षी १९ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन(International Men’s Day 2021) साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन जगभरातील सुमारे ८० पेक्षा जास्त देशांमध्ये साजरा केला जातो. International Men’s Day Special)पुरुषांसोबत होणारा भेदभाव, शोषण, होणारी हिंसा रोखन्यासाठी, त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणं आणि त्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती(Aim Of International Men’s Day) करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
[read_also content=”मुंबईतल्या प्राईम मॉलला भीषण आग,अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/fire-at-prime-mall-irla-market-of-mumbai-nrsr-203969.html”]
इतिहास
काही पुरुषांनी १९२३ साली दरवर्षी २३ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्याची मागणी केली होती. पण त्यावेळी यावर काही निर्णय झाला नाही. सन १९९१ साली हा दिवस साजरा करण्याची पुन्हा एकदा संकल्पना मांडण्यात आली. शेवटी १९९९ पासून त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या नागरिकांनी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला आणि जगभरात याचे पालन सुरु झालं. डॉ. जीरोम तिलकसिंह यांचे या क्षेत्रातले योगदान लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांच्या जन्मदिवसानिमित्त १९ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतात सर्वप्रथम २००७ साली आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
उद्देश काय ?
पुरुषांच्या आरोग्याप्रति, लिंग संबंधाविषयी जागरुकता, लैंगिक समानतेचा विकास करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. एका प्रमुख वेबसाईटने माहिती दिल्याप्रमाणे, महिलांच्या तुलनेत दरवर्षी तीनपटीने जास्त पुरुष आत्महत्या करतात. तीनपैकी एक पुरुष घरघुती हिंसाचाराला बळी पडतात. महिलांच्या तुलनेत पाच वर्षे आधीच पुरुषांचा मृत्यू होतो. त्यामुळे या सर्व गोष्टींबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला जातो. कुटुंब, समाज, समुदाय, समाज व्यवस्था या सर्वामध्ये पुरुषांच्या योगदानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आजच्या दिवशी प्रयत्न केला जातो.
पुरूषप्रधान संस्कृती म्हणवून घेणाऱ्या देशात कधी पुरुषांच्या समस्यांवर चर्चाच होत नाही. अनेक तरुण आणि पुरुष तणावात असताना आत्महत्येचा अंतिम पर्याय स्वीकारतात. जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलेल्या अहवालानुसार भारतात दर दहा हजार पुरुषांमध्ये २५८० पुरुष हे आत्महत्या करतात. भारतात पुरुषांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण हे २५.८% आहे.






