फोटो सौजन्य: सोशल मीडिया
जेरूसेलम: इस्त्रायल संशोधकांनी कर्करोगाच्या उपचारात एक महत्त्वाची क्रांती उघडकीस आणली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेल अवीव विद्यापीठातील इस्त्रायल संशोधकांनी एक असा प्रोटीन शोधून काढला आहे. हा प्रोटीन शरीराच्या प्रतिकारशक्तीली ट्यूमरवर आक्रमण करण्यापासून थांबवतो असे या संशोधकांचे म्हणणे आहे. याबबत एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
तेल अवीव विद्यापीठातील संशोधकांनी शोध लावला
या अहवालानुसार, या प्रोटीनच्या कार्यप्रणालीमध्ये बदल करून त्यांनी प्रतिकारशक्तीला कर्करोगी पेशींवर हल्ला करण्यास सक्षम केले आहे. या शोधामुळे प्रतिकारशक्तीच्या उपचारांना प्रतिसाद न देणाऱ्या कर्करोगाच्या प्रकारांवरही उपचारांची नवी दिशा मिळू शकते असे संशोधकांचे म्हणणे आहे. हा शोध तेल अवीव विद्यापीठातील प्रोहा संशोधन प्रकल्प प्रो. कार्मिट लेव्ही, प्रो. यारोन कार्मी आणि MD, PhD विद्यार्थी अविशाई मालिया यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
हे देखील वाचा- इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे होणार मोठे युद्ध? पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे
मिळालेल्या माहितीनुसार, हा शोध Nature Communications या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. या अहवालानुसार, प्रो. लेव्ही यांच्या प्रयोगशाळेत कर्करोग आणि त्वचेवर अल्ट्राव्हायलेट (UV) किरणांचा परिणाम यावर संशोधन सुरू असताना हा शोध लागला. या शोधानुसार, UV किरणे त्वचेवरील प्रतिकारशक्तीला कमी करतात. परंतु यामगचे कारण स्पष्ट संशोधकांना स्पष्ट नव्हते.
Ly6a चे प्रमाण वाढलेले आढळले
लेव्ही यांच्या मते, UV किरणांचा प्रतिकारशक्तीवर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास करताना, Ly6a नावाच्या प्रोटीनची उपस्थिती आढळली. या प्रोटीनच्या उपस्थितीमुळे प्रतिकारशक्तीवर ब्रेक लागतो. प्राथमिक प्रयोगात, UV किरणांमुळे त्वचेतील T पेशींवर Ly6a प्रोटीन वाढलेले दिसले. या प्रोटीनमुळे प्रतिकारशक्ती कमी कार्यरत होत असल्याचे निरीक्षण झाले. मालिया यांनी UV किरणांच्या संपर्कात आलेल्या माऊस मॉडेलवर प्रयोग केले. त्यांना Ly6a चे प्रमाण वाढलेले आढळले.
जगभरातील कर्करोग रुग्णांसाठी नवी आशा
संशोधकांना प्रोटीनच्या वाढत्या प्रमाणावर अँटीबॉडीने उपचार करताच, कर्करोगी पेशींमध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले. यामुळे रुग्णांना PD1 आधारित उपचारांचा फायदा होत नाही. संशोधकांनी सांगितले की, हे संशोधन मानवांवर वापरण्यासाठी आणखी चाचण्या आवश्यक आहेत. त्यावर आधारित औषध तयार करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. यामुळे, प्रतिकारशक्तीच्या वापरावर आधारित एक नवीन उपचारपद्धती विकसित होऊ शकते, यामुळे उपचारात आलेल्या मर्यादा ओलांडून, जगभरातील कर्करोग रुग्णांसाठी नव्या आशा निर्माण होऊ शकतील.