मुलांना रोज चॉकलेट खाण्याची सवय? पालकांनो सावधान! आरोग्यावर असा होतो परिणाम
पाठीतील तीव्र वेदनांमुळे तिच्या पाठीच्या कण्याचे (डी१२ व्हर्टिब्रा) असामान्य कॉम्प्रेजन फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले. वेगवेगळ्या उपचारांनंतरही मूळ कारणाचा शोध लागत नव्हता; अखेर सविस्तर तपासणीत तिला ‘कुशिंग आजार’ असल्याचे निदान झाले. हा एक अत्यंत दुर्मिळ विकार असून यात पिट्युइटरी ट्यूमरमुळे शरीरात कॉर्टिसॉल हार्मोन प्रमाणाबाहेर वाढते. या गुंतागुंतीच्या उपचारासाठी तिने जसलोक हॉस्पिटलची निवड केली, जिथे तज्ज्ञांच्या ‘पिट्युइटरी टीम’ने तिच्यावर यशस्वी उपचार केले.
१ जुलै २०२६ रोजी तिच्यावर मिनिमली इन्व्हेसिव्ह एंडोस्कोपिक एंडोनेझल पिट्युइटरी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही एक विशेष शस्त्रक्रिया आहे, जी बाहेरील त्वचेवर कोणतीही जखम न करता संपूर्णपणे नाकाच्या माध्यमातून केली जाते. या शस्त्रक्रियेचे नेतृत्व कन्सल्टंट स्कल बेस न्यूरोसर्जन डॉ. राघवेंद्र रामदासी आणि कन्सल्टंट ईएनटी स्कल बेस सर्जरी डॉ. राकेश कटना यांनी केले. न्यूरोअॅनेस्थेटिस्ट डॉ. सावी कपिला यांनी भूल देण्याची जबाबदारी पार पाडली, तर कन्सल्टंट एंडोक्रिनोलॉजी डॉ. शैवल चंडालिया यांनी एण्डोक्राइन व्यवस्थापनाची देखरेख केली. कन्सल्टंट स्पाइन सर्जरी डॉ. मनीष कोठारी यांनी तिच्या पाठीच्या कण्याच्या फ्रॅक्चरचे मूल्यमापन केले आणि क्रिटिकल केअर मेडिसिनचे अॅडिशनल डायरेक्टर डॉ. इंद्रनील राऊत यांनी तिच्या मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर शारीरिक गुंतागुंतीचे व्यवस्थापन केले.
शस्त्रक्रियेचे सुरुवातीचे परिणाम अतिशय आश्वासक मिळाले आहेत. तिच्या रक्तातील कॉर्टिसॉलची पातळी अत्यंत वेगाने कमी आली. तसेच चार महिन्यांनंतर तिची मासिक पाळी पूर्ववत सुरू झाली, जे ट्यूमर यशस्वीरित्या काढून टाकल्यानंतर प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असल्याचे दर्शवते. कॉर्टिसॉलचे प्रमाण सामान्य होत असल्याने तिचा मधुमेह, रक्तदाब, हाडांचे आरोग्य, हार्मोनल संतुलन आणि एकूण जीवनमानात टप्प्याटप्प्याने सुधारणा होईल, अशी अपेक्षा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील कन्सल्टंट – स्कल बेस न्यूरोसर्जरी डॉ. राघवेंद्र रामदासी म्हणाले, “कुशिंग आजाराचे रुग्ण न्यूरोसर्जनकडे येईपर्यंत त्यांच्यात अनेक गुंतागुंती निर्माण झालेल्या असतात. तपासणीत लहान दिसणाऱ्या या ट्यूमरचा वास्तविक आकार शस्त्रक्रियेदरम्यान दुप्पट आढळला. अशा हार्मोन निर्मिती करणाऱ्या ट्यूमरच्या बाबतीत, आजूबाजूच्या निरोगी ग्रंथीला सुरक्षित ठेवत संपूर्ण ट्यूमर बाहेर काढणे गरजेचे असते. आम्ही नाकाच्या माध्यमातून एंडोस्कोपचा वापर करून, शरीरावर कोणताही छेद न घेता हा ट्यूमर पूर्णपणे यशस्वीरीत्या काढला, ज्यामुळे रुग्णाला दीर्घकालीन आजारमुक्ती मिळेल.”
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील कन्सल्टंट एंडोक्रिनोलॉजी डॉ. शैवल चंडालिया म्हणाले, “कुशिंग आजाराची लक्षणे लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या सामान्य आजारांशी मिळतीजुळती असल्याने याला ‘भूलवणारा आजार’ म्हटले जाते. म्हणूनच, प्रत्येक लक्षणावर वेगवेगळा उपचार न करता त्यांच्यातील संबंध ओळखणे महत्त्वाचे असते. रुग्णाला पूर्णपणे बरे करण्यासाठी आणि गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी वेळेवर हार्मोन तपासणी, अचूक निदान आणि एंडोक्रिनोलॉजी व न्यूरोसर्जरी विभागांमधील योग्य समन्वय अत्यंत आवश्यक आहे.”
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे सीईओ श्री. जितेंद्र हरियान म्हणाले, “ही केस अखंड बहुविद्याशाखीय समन्वय आणि प्रगत वैद्यकीय कौशल्याच्या जोडीने अत्यंत गुंतागुंतीच्या विकारांवर यशस्वी उपचार करण्याच्या जसलोक हॉस्पिटलच्या क्षमतेचे उत्तम उदाहरण आहे. अचूक निदानापासून ते विशेष शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रियेनंतरच्या सर्वसमावेशक काळजीपर्यंत आमचा हा एकात्मिक दृष्टिकोन भारत आणि जगभरातील रुग्णांना एकाच छताखाली जागतिक दर्जाचे उपचार परवडणाऱ्या खर्चात मिळवून देण्यास सक्षम करतो.”
आपल्या प्रकृतीतील सुधारणेबद्दल आनंद व्यक्त करत शहादा म्हणाल्या, “अनेक महिन्यांपासून मी वाढणारे वजन, थकवा आणि अनेक आरोग्य समस्यांशी लढा देत होते, पण याचे खरे कारण मला माहीत नव्हते. जसलोक हॉस्पिटलमध्ये आल्यामुळे मला योग्य निदान आणि आशेचा किरण मिळाला. येथील डॉक्टरांनी माझी अत्यंत काळजीपूर्वक आणि आपुलकीने देखभाल केली. आज मला वाटते की, मला नवीन आयुष्य मिळाले आहे. आता मी अधिक निरोगी आणि खंबीर होऊन मायदेशी परत जाण्यासाठी उत्सुक आहे.”
कुशिंग आजार हा एक दुर्मिळ आजार असला आणि ओमानमध्ये याची अत्यंत मर्यादित केसेस नोंदवली गेली असली, तरी या यशस्वी उपचारामुळे आजाराचे वेळेवर निदान करणे आणि वेगवेगळ्या विद्याशाखेतील तज्ज्ञांच्या एकत्रित वैद्यकीय देखरेखीचे महत्त्व अधोरेखित होते. ही तरुण महिला आपल्या प्रकृतीत पुढील सुधारणेसाठी मायदेशी परतत असताना तिचा हा प्रवास महत्त्वाची आठवण करून देतो की, वरवर एकमेकांशी संबंधित न वाटणारी लक्षणे देखील एखाद्या मुख्य आजाराची शक्यता व्यक्त करू शकतात आणि वेळेवर झालेले अचूक निदान जीवन बदलणारे ठरू शकते.
Water Intake: जास्त पाणी पिणं खरंच आरोग्यासाठी वरदान आहे का? जाणून घ्या सत्य






