
photo - yandex
Health Tips: रोज मूठभर खा गूळ-चना; शरीराला मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे
चपातीचे पीठ ना खूप कडक, ना खूप सैल असावे. गरजेनुसार पाणी घालून पीठ मळावे. इच्छित असल्यास त्यात एक चमचा दही, थोडे दूध किंवा थोडे तेल मिसळल्यास चपाती अधिक मऊ होण्यास मदत होते.
पीठ मळल्यानंतर ते 20 ते 30 मिनिटे झाकून ठेवावे. यामुळे पिठातील ओलावा टिकून राहतो आणि ग्लुटेन व्यवस्थित तयार होते आणि चपाती लाटण्यास सोप्या होतात आणि जास्त वेळ मऊ राहतात.
तवा चांगला गरम झाल्यानंतरच चपाती भाजण्यास सुरुवात करा. खूप मोठ्या आचेवर चपाती भाजल्यास ती कोरडी पडू शकते, तर कमी आचेवर जास्त वेळ भाजल्यासही चपाती कडक होण्याची शक्यता असते. मध्यम आचेवर चपाती भाजल्यास ती मऊ आणि फुगलेली तयार होते.
चपाती तव्यावरून उतरवल्यानंतर त्यावर हलके तूप किंवा लोणी लावल्यास तिच्यातील ओलावा टिकून राहतो. त्यामुळे चपाती अधिक वेळ मऊ राहते. कमी फॅटचा आहार घेणाऱ्यांनी हा पर्याय आवश्यकतेनुसार वापरावा.
चपाती तयार झाल्यानंतर त्या स्वच्छ सुती कापडात गुंडाळून हॉटकेस किंवा झाकण असलेल्या डब्यात ठेवाव्यात. उघड्यावर ठेवल्यास त्यातील ओलावा कमी होऊन त्या लवकर कडक होतात.
Health Tips: रात्रभर Earbuds लावून झोपता? कानांसाठी ‘ही’ सवय ठरू शकते धोकादायक