Know How To Make Carrot Gulabjam At Home Recipe In Marathi
Recipe : थंडीत गोडाचा नवा ट्रेंड! हलवा सोडा, यंदाच्या हिवाळ्यात घरी बनवा ‘गाजराचे गुलाबजाम’
Carrot Gulabjam Recipe : गाजराचा हलवा तर तुम्ही अनेकदा खाल्ला असेल पण तुम्ही कधी गाजराचे गुलाबजाम खाल्ले आहेत का? यंदाच्या हिवाळ्यात ही हटके रेसिपी घरी नक्की बनवा आणि कुटुंबालाही खाऊ घाला.
गाजराचे गुलाबजाम, यावेळी हलवा नाही तर काही वेगळं ट्राय करा
हिवाळ्याच्या दिवसांत बाजारात रंगीबेरंगी भाज्यांची रेलचेल असते. यामध्ये गाजराला खास स्थान आहे. गाजराचावापर सॅलड, भाजी, कोशिंबीर ते गोड पदार्थांपर्यंत केला जातो. हिवाळ्यात जवळपास प्रत्येक घरात गाजराचा हलवा हमखास बनतो आणि सगळ्यांनाच तो आवडतो. मात्र आता गाजराचा हलवा खूपच सर्वसाधारण गोड पदार्थ झाला आहे. त्यामुळे जर तुम्हाला गाजरापासून काहीतरी वेगळे आणि खास बनवायचे असेल, तर गाजराचे गुलाबजाम नक्की करून पाहा. हे बनवायला सोपे, झटपट तयार होणारे आणि चवीला अप्रतिम असतात. चला तर जाणून घेऊया गाजराचे गुलाबजाम कसे तयार करायचे. नोट करूयात यासाठी लागणारे आवश्यक साहित्य आणि कृती.
सर्वप्रथम साखरेची पाक तयार करून घ्या. एका पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून गॅसवर ठेवा.
साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आणि उकळी येईपर्यंत पाक शिजवा. साधारण एकतारी पाक तयार झाला की त्यात थोडी वेलची पूड घालून गॅस बंद करा.
आता गुलाबजामसाठीचे मिश्रण तयार करा. एका कढईत थोडेसे तूप गरम करून त्यात उकडलेले आणि किसलेले गाजर घाला आणि दोन ते तीन मिनिटे परतून घ्या.
त्यानंतर त्यात खोया किंवा मावा घालून नीट मिसळा. मिश्रण घट्ट होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा. गॅस बंद करून हे मिश्रण थोडे थंड होऊ द्या.
मिश्रण कोमट झाल्यावर त्यात मैदा आणि उरलेली वेलची पूड घालून मऊ पीठ मळा. पीठ खूप चिकट वाटल्यास थोडासा मैदा घालू शकता, मात्र जास्त मैदा घातल्यास गुलाबजाम कडक होऊ शकतात.
तयार पिठाचे लहान लहान गुळगुळीत गोळे करून घ्या. गोळ्यांवर कुठेही भेगा राहू देऊ नका. एका कढईत तूप किंवा तेल गरम करा आणि आच मंद ठेवा.
गोळे हळूवारपणे तेलात सोडून मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा. मंद आचेवर तळल्याने गुलाबजाम आतपर्यंत व्यवस्थित शिजतात. तळलेले गुलाबजाम थेट गरम पाकात टाका.
गुलाबजाम किमान पंधरा ते वीस मिनिटे किंवा सुमारे एक तास पाकात भिजू द्या, जेणेकरून ते पाक शोषून घेऊन छान फुलतील.
तयार झालेले गाजराचे गुलाबजाम पिस्ता किंवा बदामाने सजवा. हे गुलाबजाम गरम किंवा थंड, दोन्ही प्रकारे सर्व्ह करता येतात.
Web Title: Know how to make carrot gulabjam at home recipe in marathi