'शत धौता घृत' पद्धती म्हणजे नेमकं काय?
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. त्वचा कोरडी झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट, केमिकल ट्रीटमेंट इत्यादी अनेक गोष्टी करतात. मात्र त्याचा फारसा परिणाम त्वचेवर दिसून येत नाही. अशावेळी त्वचेची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा. घरातील प्रत्येक स्वयंपाक घरात तूप हा पदार्थ उपलब्ध असतोच. तुपाचे सेवन केल्यामुळे त्वचा हायड्रेट आणि चमकदार राहते. तसेच त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी तुपाचा वापर करावा. तुपामध्ये अनेक गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे नियमित सकाळी उठल्यानंतर तुम्ही एक चमचा तुपाचे सेवन केल्यास आरोग्यासह त्वचेला अनेक फायदे होतील.(फोटो सौजन्य – iStock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
हिवाळ्यात हातापायांची त्वचा, चेहरा, ओठ हातांचे कोपरे पूर्णपणे कोरडे होऊन जातात. कोरडी झालेली त्वचा काळवंडलेली दिसू लागते. अशावेळी त्वचेची काळजी घेण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करावा. पण बाजारात उपलब्ध असलेले केमिकल मॉइश्चरायझर वापरण्यापेक्षा घरच्या घरी तुपाचा वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मॉइश्चरायझर तयार करू शकता. यामुळे तुमची त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होईल. चला तर जाणून घेऊया तुपापासून मॉइश्चरायझर तयार करण्याची सोपी कृती.
तूप त्वचेवर नैसर्गिक मॉइश्चरायझर प्रमाणे काम करते. याशिवाय आयुर्वेदात तूप तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया सांगण्यात आली आहे. या प्रक्रियेनुसार तूपासून मॉइश्चरायझर तयार केल्यास त्वचेमध्ये अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. शिवाय कोरडी झालेली त्वचा सुंदर आणि मुलायम दिसू लागेल. आयुर्वेदात सांगण्यात आलेल्या प्रक्रियेला ‘शत धौता घृत’ असे म्हंटले जाते. “शत” म्हणजे “शंभर”, “धौता” म्हणजे “धुतलेले” आणि “घृत” म्हणजे “तूप.” यामध्ये तूप धुवण्याची प्रक्रिया सांगण्यात आली आहे. यामध्ये भांड्यात तूप घेऊन त्यात वारंवार पाणी घालून पांढऱ्या रंगाची पेस्ट तयार केली जाते. तुपाचा वापर करून नैसर्गिक पेस्ट तयार करून त्वचेला लावल्यास त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होईल.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
थंडीच्या दिवसांमध्ये कोरडी पडलेली त्वचा सुधारण्यासाठी शिवाय हातापायांना पडलेल्या भेगा आणि त्वचेच्या इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही या क्रीमचा वापर करू शकता. यासाठी चांदीच्या ताटात तूप घेऊन त्यात थंड पाणी टाकून गोलाकार फिरवत पांढऱ्या रंगाची लोणी सारखी पेस्ट तयार करून घ्या. 100 वेळा तूप स्वच्छ धुतल्यानंतर पांढऱ्या रंगाची पेस्ट तयार होईल.