तोंडी लावण्यासाठी बनवा मिक्स भाज्यांचे चमचमीत लोणचं
जेवणाचं ताट वाढल्यानंतर अनेकांना ताटात लोणचं हे लागतच. मग ते आंब्याचं असो किंवा लिंबाचं असो. जेवणात लोणचं असेल तर जेवणाची चव आणखीन वाढते. भारतीय जेवणात जेवणाच्या ताटात लोणचं नसेल तर जेवणाचं ताट अपूर्ण आहे. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोणची उपलब्ध आहेत. आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं, लसणीचे लोणचं, गाजरचे लोणचं इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची लोणची बाजारात मिळतात. पण कधी तुम्ही भाज्यांचे लोणचं खाल्ले आहे का? भाज्यांपासून बनवलेले लोणचं आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. लहान मुलांना भाज्या खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना भाज्यांपासून बनवलेलं लोणचं खाण्यास देऊ शकता. चला तर जाणून घेऊया भाज्यांचे लोणचं बनवण्याची सोपी कृती.
हे देखील वाचा: सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी बनवा नाचणीच्या पिठाचा जाळीदार चिला