दह्यात हा पदार्थ मिक्स करून त्वचेवर लावा
वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यासह त्वचेवरसुद्धा लगेच दिसून येतो. धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक कारणांमुळे त्वचा अधिक खराब आणि काळवंडून जाते. त्वचेवर असलेल्या ओपन पोर्समध्ये धूळ, माती चिटकून राहते, ज्यामुळे त्वचेवर अतिरिक्त तेल जमा होणे, पिंपल्स येणे, पुरळ येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची काळजी घेणे जास्त गरजेचे आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट, वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट इत्यादी अनेक गोष्टी करून घेतल्या जातात. मात्र या सगळ्याचा फारकाळ त्वचेवर परिणाम दिसून येत नाही. यामुळे काहीवेळा त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होऊन जाते.(फोटो सौजन्य – iStock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम वापरण्यापेक्षा घरगुती पदार्थांचे वापर करावा. घरगुती पदार्थांच्या वापरामुळे त्वचा नैसर्गिकरित्या उजळदार आणि चमकदार दिसते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थ वापरल्यामुळे त्वचेचे कोणतेही नुकसान होत नाही. शिवाय त्वचा अधिक हायड्रेट आणि मुलायम राहते. आज आम्ही तुम्हाला मुलायम आणि चमकदार त्वचेसाठी दह्यात कोणता पदार्थ मिक्स करून लावावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
दही, हळद
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
थंडीमध्ये त्वचेची चमक कमी होऊन जाते. याशिवाय त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी दही आणि हळदीचा वापर करावा. यामुळे त्वचा उजळदार आणि सुंदर दिसते. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता. यामुळे त्वचा गोरीपान आणि डागविरहित होईल. दही लावल्यामुळे त्वचेवर आलेले डाग निघून जातात.