आजकाल सोन्या चांदीपेक्षा सर्वात जास्त महत्वाचं आणि महागडं काय असेल तर ते म्हणजे जॉब. देशात सुशिक्षित तरुणांची काही कमी नाही पण कमी आहे ते चांगल्या जॉबची. घर-कुटुंब सांभाळावं आणि जबारदाऱ्या पार पाडाव्यात यासाठी खुप जणं पडेल ते काम करतात. देशात असे काही जॉब अनेकजणं करतात जे जीवावर बेतणारे आहेत. असा जीवावर बेतणणारा जॉब करणारे देखील तितकेच धाडसी आणि कर्तव्यदक्ष आहेत. कोणते आहेत जॉब चला तर मग जाणून घेऊयात.
असा जीवावर बेतणारे जॉब करणारे ही माणसं देखील तितेकीच खंबीर मनाचे असतात. त्यांची नोकरी म्हणजे केवळ पगार मिळवण्याचे साधन नाही, तर ती अनेकदा जीव धोक्यात घालून स्विकारलेली जबाबदारी असते. भारतात अशा अनेक नोकऱ्या आहेत ज्या अत्यंत भायनक, धोकादायक आणि मानसिक-शारीरिकदृष्ट्या कठीण मानल्या जातात. या नोकऱ्या करणाऱ्या व्यक्ती रोज मृत्यूला सामोरं जात असतात.
कोळसा किंवा इतर खनिजांच्या भुयारी खाणींमध्ये काम करताना दरड कोसळणे, विषारी वायू, ऑक्सिजनची कमतरता यांचा मोठा धोका असतो. अनेक वेळा अपघातात कामगारांचा मृत्यू होतो. ही माणसं रोज मृत्यूच्या सावटाखाली जगत असतात. येणारा प्रत्येक दिवस हा त्यांच्या आयुष्याच्या शेवटाचा कधी असू शकेल हे सांगता येत नाही.
सफाई कामगाारांना अनेकदा तुच्छतेने वागवलं जातं. पण हीच माणसं देशाच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतात. स्वत: घाणीत उतरुन गटारसाफ करणं, रोजच्या रोज सार्वजनिक शौचालयं साफ करणं हे त्यांच्या आरोग्यावर बेतणारं असतं. मात्र तरी ही माणसं काटेकोरपणे आपलं काम करतात. देशाच्या स्वच्छतेसाठी यांचं समाजकार्य मोठं आहे. भारतामध्ये अजूनही काही ठिकाणी सांडपाणी साफ करणारे कामगार अत्यंत धोकादायक परिस्थितीत काम करतात. विषारी वायूंमुळे त्यांचे आरोग्य आणि जीव दोन्ही धोक्यात येतात.
देशाच्या सुरक्षेसाठी काम करणारे बॉम्ब निकामी करणारे तज्ज्ञ हे कायमच मृत्यू हातावर घेऊन वावरत असतात. यांचे काम तर क्षणात जीव घेऊ शकणारे असते. एक छोटीशी चूक त्यांच्यासह इतरांचा जीव जाण्यास कारणीभूत ठरु शकते. देशाचे सीमा भाग सुरक्षित राहावेत यासाठी भारताचे सैन्यदल सदैव तत्पर असतं. शत्रूशी लढताना या वीर जवानांना जीवाची बाजी लावत नैसर्गिक आपत्तींना देखील सामोरं जावं लागतं. याला अपवाद अग्नीशमक दल आणि पोलीस यंत्रणा देखील नाही. आगीमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवताना स्वतःचा जीव धोक्यात घालतात. धूर, उष्णता आणि इमारत कोसळण्याचा धोका नेहमीच असतो. तसेच लाईनमन म्हणजे उच्चदाब वीजवाहिन्यांवर काम करणारे कर्मचारी यांचा हाय व्होल्टेजमुळे मृत्यू देखील होऊ शकतो. नौदलात कर्तव्य बजावणारे आणि मासेमारी करणारे बांधव खोल समुद्रात वादळी वाऱ्याची जोखीम उचलत जीवावर उदार होत काम करतात.
जगाचा पोशिंदा कोण तर बळीराजा हे कायमच शाळेत शिकवलं जातं. पण हेच शिक्षण आता शाळेच्या परिक्षेत मार्क मिवण्यापुरतं राहिलं आहेे. ज्याच्या शेती करण्याने पोटभऱ खायला मिळतं तोच शेतकरी काबाडकष्ट करुनही कायमच आर्थिक समस्येला सामोरं जातो. दुष्काळाने असलं नसलं पीक खराब झालं तर याच शेतकऱ्याला जीव देण्यापलीकडे पर्याय उतर नाही. जो प्रत्येकाचं पोट भरतो तोच उपाशी मरतो हे शेतकऱ्याच्या जगण्याचं दुख आहे. असा हा धाडसी जॉब करणारे खरे देशाचे रत्न आहेत आणि त्यांच्या या कर्यामुळे आज देशातील प्रत्येक जण सुरक्षित आयुष्य जगत आहेत.






