(फोटो सौजन्य – iStock)
यंदा ११ मे रोजी जगभर मातृदिन म्हणजेच मदर्स डे साजरा केला जाणार आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजऱ्या होणाऱ्या या विशेष दिवशी, समाजातील मातृत्वाचा सन्मान करण्यात येतो. आईच्या अमर्याद प्रेमाला, त्यागाला आणि तिच्या मोलाच्या योगदानाला वंदन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. या दिवशी विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, सन्मान समारंभ तसेच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतो.
जगात इतर कोणत्याही नात्यातून वेगळे आणि प्रेमाचे नाते हे आपले आपल्या आईसोबतचे असते. आईला ममतेचे रूप मानले जाते मात्र वेळ पडली तर हीच आई आपल्या मुलांसाठी संपूर्ण जगाशी लढायलाही मागेपुढे बघत नाही. जगात निस्वार्थीपणे आपल्याला प्रेम करणारी फक्त आईच असते. नऊ महिने जिच्या पोटात आपण वाढलो, जिने आपल्याला जन्म दिला, या जगात आपल्याला एक नवीन ओळख दिली अशा आईला या दिवशी एक खास गिफ्ट देणे तर बनतेच. तुम्हीही मदर्स डेनिमित्त आपल्या आईला काही खास भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. आज आम्ही अशा काही गिफ्ट आयडीयाज सांगणार आहोत ज्या तुमच्या आईसाठी खास आणि मनापासून आनंद देणाऱ्या ठरतील.
हँडमेड कार्ड किंवा पत्र
तुमच्या भावना व्यक्त करणारे एक छोटंसं हँडमेड पत्र किंवा सुंदर डिझाईन केलेलं कार्ड तयार करा. तुम्ही यात आईबद्दलचे तुमचे प्रेम, कृतज्ञता आणि आठवणी लिहू शकता. याहून खास आणि हृदयस्पर्शी भेट कुठलीच नाही
घरगुती आवडता पदार्थ
आपल्या काही रुचकर खायचे असले की आपण तो पदार्थ आपल्या आईला बनवायला सांगतो. मदर्स डे निमित्त आईला किचनपासून सुट्टी द्या आणि तिला तिचे आवडीचे पदार्थ खाऊ घाला. तुम्ही हे पदार्थ तुमच्या हातांनीही तयार करू शकता. तुम्हीही आईसाठी केलेले हे प्रयत्न पाहून आई नक्कीच तुमच्यावर खुश होईल.
Weight Loss Tips: हसत-खेळत वजन होईल कमी, डाएटचीही गरज नाही; फक्त ‘या’ टिप्स फॉलो करा
वेळेची भेट
मदर्स डेनिमित्त सगळ्यांत मोठी भेट म्हणजे तुमचा वेळ. अनेकदा कामाच्या व्यापामुळे आपण आपली आईला पुरेसा वेळ देत नाहीत. अशात तिच्यासोबत एखादा दिवस घालवा – एकत्र जेवण, चित्रपट, गप्पा किंवा एक छोटी सहल करून तुम्ही हा दिवस आणखीन खास बनवू शकता.
वैयक्तिक वस्तू
आईच्या आवडीनुसार एखादी वस्तू द्या. जसं की एक सुंदर साडी, पुस्तक, सुगंधी मेणबत्त्या, हँडमेड दागिने किंवा घर सजावटीच्या वस्तू. तुमच्या आईची आवड जाणून घ्या आणि त्यानुसार आईला तिच्या आवडीची भेटवस्तू द्या.
आरोग्यविषयक भेट
वय वाढले की आरोग्याच्या समस्याही वाढू लागतात. अशात तिच्या आरोग्याची काळजी घेत, योगा मॅट, मसाजर, हर्बल चहा, आरोग्यदायी खाण्याचे पॅकेज यांसारखी उपयुक्त भेटवस्तू गिफ्ट करा.
या आयडीयाजच्या मदतीने तुम्ही कोणतीही भेटवस्तू निवडून, तुमच्या आईला मदर्स डेच्या दिवशी खास आणि आनंददायक अनुभव देऊ शकता. तुमच्या आईच्या आवडीनुसार योग्य भेटवस्तू निवडा आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलवा!