फोटो सौजन्य - Social Media
मुंबईला कधीही न झोपणारे शहर म्हंटले जाते. या शहरात उजेड मात्र कायम असतो. पण इथे अशा काही जागा आहेत, जिथे जाण्यास स्थानिकांना ही घामाच्या धारा फुटतात. मुंबई शहर तसे गजबजीचे आहे पण काही ठिकाणी शांतता मात्र कायम आहे. ही शांतता इतकी भयाण आहे की दिवसाही इथे कुणी फिरकत नाही. ही शांतता फक्त जाणवत नाही तर खायला उठते. जगणं कठीण करून टाकणारी ही शांतता जाणवते मुंबईच्या डिसुझा चाळीत!
माहीम परिसरात असणारी ही चाळ हॉरर मानली जाते. येथे चारी प्रहरी तिचे अस्तित्व जाणवत असते. आसपास कुणीही नसतं तरीही आपल्यासोबत कुणीतरी असल्याचा भास होत असतो. लक्षात ठेवा, कुणी तरी आपल्यासोबत असतं पण आपल्यासाठी नसतं… ती भयाण साथ कधीही जीवावर बेतण्याच्या तयारीत असते. तिला हाव असते ती फक्त आपल्या जीवाची!
मुंबईतील डिसुझा चाळीत आजही एक विहीर आहे. त्या विहिरीत एका माहितीचे अस्तित्व आहे, जिचा मृत्यू ३९ चाळीस वर्षांपूर्वीच झाला आहे. विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेलेली ही महिला घरी कधी परतलीच नाही. ती कायमची निवासी झाली त्या विहिरीची… त्या घटनेपासून चाळीशेजारील राहणारे स्थानिक यांच्या मनात दुःख तर उरले त्याचसह मनात भीतीनेही मोठी जागा घेतली. त्या विहिरीच्या सभोवतालने नवा जन्म घेतला. कालपर्यंत सभोवतालची तहान घालवत आलेली ती विहीर, त्या घटनेपासून लोकांच्या तोंडच पाणी पळवू लागली. त्या विहिरीच्या शेजारून जाताना लोकांना घामाच्या धारा वाहू लागल्या.
असं म्हणतात की ती स्त्री आजही तिथे असते. विशेष म्हणजे अशी कोणतीही घटना अद्याप समोर आली नाही की त्या प्रेतात्मेमुळे कुणाचा जीव गेला. पण कितीही झाले तरी शेवटी ती प्रेतात्माच! अनेक वर्षे उलटली पण तिची उपस्थिती आणि तिचा भास आजही टिकून आहे. रात्रीच्या वेळेस भर काळोखात आजही ती दिसते, जाणवते आणि असते.