Chinese Garlic Import: स्थानिक लसणाला फटका, बाजारात चिनी लसणाची महागडी एंट्री (फोटो-सोशल मीडिया)
Chinese Garlic Import: नवी मुंबईतील वाशी APMC बटाटा आणि कांदा बाजारात लसणाचा पुरवठा कमी होत आहे, त्यामुळे काही व्यापारी चीनमधून लसूण आयात करत आहेत. स्थानिक लसणापेक्षा ही किंमत जास्त आहे. घाऊक बाजारात चिनी लसूण २५० रुपये प्रति किलो पर्यंत विकला जात आहे, तर स्थानिक लसूण जास्तीत जास्त १३० रुपये प्रति किलो पर्यंत मिळत आहे. चिनी लसूणाच्या तुलनेत स्थानिक लसणाची किंमत कमी असल्याने भारतातील लसूण उत्पादकांमध्ये निराशा पसरली आहे.
चीनमधून येणाऱ्या लसणाच्या पिशव्यांवर अफगाणिस्तान असे लेबल लावले जाते. वाशी एपीएमसी बटाटा आणि कांदा मार्केटमधील घाऊक व्यापारी मनोहर तोतलानी यांच्या मते, सध्या दररोज फक्त २,४१७ पोती लसण बाजारात येत आहेत, ज्यामध्ये चीनमधून आयात केलेला लसूण देखील समाविष्ट आहे.
चिनी लसूण २५० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. चिनी लसूण सध्या घाऊक बाजारात २०० ते २५० रुपये प्रति किलोने विकला जात आहे, तर उटी येथील स्थानिक लसूण ६० ते १३० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. भारतातील इतर राज्यांमधून येणारा लसूण प्रति किलो ५० ते १२० रुपयांना मिळत आहे. म्हणजेच, देशातील अथवा स्थानिक लसूण परदेशी लसणाच्या वरचढ चढत आहे. त्यातच, यावर्षी देशात झालेल्या अवकाळी पावसामुळे लसूणाचे नुकसान शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे देखील याचा फटका स्थानिक बाजारात बसत आहे.
तज्ञांच्या मते, अवकाळी पावसामुळे भारतात पिकवल्या जाणाऱ्या लसूणाचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे त्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. याचा फायदा घेण्यासाठी काही व्यापारी चीनमधून विविध मार्गांनी लसूण आयात करत आहेत आणि ते चढ्या दराने विकत आहेत. हे व्यापारी भारत सरकार आणि स्थानिक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करत आहेत, ही बाब भारत सरकार आणि एपीएमसी अधिकाऱ्यांकडून गांभीर्याने घेतली जात नाही.






